Maratha Politics : नाशिकमध्ये मराठा आंदोलनाची धग! आंदोलक आक्रमक; रस्ता रोखला, जोरदार घोषणाबाजी!

Nashik Road Blockade Manoj Jarange : नाशिकमध्ये मराठा युवकांनी मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाला पाठिंबा देत रास्ता रोको केला. मराठा आरक्षण आणि कुणबी दाखल्याच्या मागण्या मान्य न झाल्यास मुंबईत आंदोलन तीव्र करण्याचा इशारा दिला.
Rasta Roko
Nashik Maratha youth held a Rasta Roko supporting Manoj Jarange PatilSarkarnama
Published on
Updated on

Manoj Jarange Patil News : मागील 15 दिवसांपासून मनोज जरांगे पाटील हे आंतरवाली सराटीत उपोषण करत आहेत. मात्र, सरकारकडून त्यांना अपेक्षित प्रतिसाद मिळताना दिसत नाही. त्यामुळे आता मराठा समाज आक्रमक झाला असून ठिकठिकाणी आंदोलन करत आहे.

जरांगे पाटील यांच्या आंदोलनाला नाशिकमध्ये देखील प्रतिसाद मिळतो आहे. नाशिकच्या युवकांनी सक्रिय पाठिंबा देत समाजाचा अंत पाहू नये.,अन्यथा हे आंदोलक मुंबईत शिरतील, असा इशारा सरकारला दिला आहे.

मनोज जरांगे पाटील यांनी मराठा आरक्षण आणि कुणबी दाखला या विषयावर अंतरवली सराटी येथे उपोषण सुरू केले आहे. हे आंदोलन राज्य सरकारच्या उपेक्षेमुळे लांबले आहे. विविध मंत्री चर्चेचे नाटक करीत असल्याचा आरोप देखील नाशिकमधील आंदोलकांनी केला आहे. आंदोलकांनी ठिकठिकाणी रास्ता रोको करत आपला संताप व्यक्त केला.

नाशिक जिल्ह्यात चांदवड, मनमाड, येवला, देवळा यांसह विविध ठिकाणी रास्ता रोको करण्यात आला. शुक्रवारी नाशिक शहरात महिला वनी येथे नाशिक त्र्यंबकेश्वर रस्ता अडविण्यात आला. युवा आंदोलकांनी यावेळी मनोज रांगे पाटील यांना समर्थन जाहीर केले.

Rasta Roko
Manoj Jarange Backfut : अवास्तव मागण्या अन् निवडणुकीची भीती संपली; मनोज जरांगेंना शिंदे-फडणवीसांनी कसं एकाकी पाडलं? इनसाईड स्टोरी...

आंदोलक म्हणाले, सरकारने गरजू मराठा समाजाच्या मनातील भुमिका समजून घ्यावी. आरक्षण आणि कुणबी दाखला या विषयावर समाजाचे अडवणूक करणे थांबवावी अन्यथा मनोज जरांगे पाटील यांच्या समर्थनासाठी आंदोलक मुंबईला धडकतील. राज्य शासनाने आंदोलकांचा अंत पाहू नये. जरांगे पाटील यांच्या मागण्या तातडीने मान्य कराव्यात, असे यावेळी आंदोलकांनी सांगितले.

या आंदोलनात कैलास खांडबहाले, दिगंबर ढगे,‌ उत्तमराव खांडबहाले, अनिल भावले, रोशन भावले, विष्णु ढगे, संपत चव्हाण, गोरख नाना चव्हाण, दत्तू मोरे, संतोष खांडबहाले, तुकाराम कापसे यांसह मराठा क्रांती मोर्चाचे विविध पदाधिकारी सहभागी झाले होते.

जरांगे पाटील मुंबईत जाण्यावर ठाम

आज आंतरवाली सराटीत बैठक होत असून या बैठकीत मुंबईला जाण्यासाठी तारीख आणि मार्ग निश्चित करण्यात येणार आहे. ज्याला शक्य आहे त्याने मोर्चात यावे, असे आवाहन मनोज जरांगे पाटील यांनी केले आहे. सरकारने मराठा मोर्चासाठी अजून परवानगी दिली नाही. त्यामुळे मोर्चा निघाला तर नेमके कुठे आंदोलन करणार याविषयी आजच्या बैठकीत निर्णय होण्याची शक्यता आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com