Devendra Fadnavis-Manoj jarange Patil Sarkarnama
महाराष्ट्र

Video Manoj Jarange Patil : देवेंद्र फडणवीस रॅली काढणार! मनोज जरांगेंनी दिलं चॅलेंज, 'काही करा...'

Manoj Jarange Patil Vs devendra fadnavis : फडणवीस यांनी पहिल्याच कॅबिनेटमध्ये धनगर समाजाला आरक्षण देणार म्हणून घोषणा केली होती. त्याचं काय झालं. धनगर बांधवांचा कार्यक्रम लावला, अशी टीका मनोज जरांगे यांनी केली.

Roshan More

Manoj Jarange Patil News : विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकी पक्ष रॅली काढत आहेत. अजित पवार यांची जनसन्मान रॅली सुरू आहे. तर, शरद पवार गटाची शिवसंकल्प रॅली आज (बुधवार) धाराशिवमध्ये आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली भाजपची रॅली देखील निघणार आहे.

भाजपच्या रॅलीला मराठा समाज विरोध करणार का? यावर मनोज जरांगे पाटील यांनी मोठं वक्तव्य केलं आहे. तसेच देवेंद्र फडणवीस यांना चॅलेंज दिले आहे.

'तुम्ही काही करा पण आरक्षण दिले नाही तर सत्तेत येणार नाही. सत्तेसाठी रॅली काढू नका. फडणवीस यांना रॅली काढायची असेल तर त्यांनी मराठा समाजाच्या आरक्षणासाठी काढावी. मी तर म्हणतो त्यांनी मराठा समाजासाठी उपोषणाला बसावे. तिकडे जास्त लोकं येतील.', असे जरांगे पाटील म्हणाले.

विरोध करणार नाही

फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली निघणाऱ्या रॅलीला आमचा विरोध नाही. मात्र, मराठा समाज यात सहभागी होणार नाही. लोकशाहीत सगळ्यांना सभा, रॅली काढण्याचा अधिकार आहे, असे जरांगे पाटील म्हणाले

फडणवीसांकडे संपवा संपवी खातं

फडणवीस यांनी पहिल्याच कॅबिनेटमध्ये धनगर समाजाला आरक्षण देणार म्हणून घोषणा केली होती. त्याचं काय झालं. धनगर बांधवांचा कार्यक्रम लावला.नवीन खातं तयार करा 'संपवा संपवी' खातं आणि ते खातं देवेंद्र फडणवीस यांच्याकडे पाहिजे. ते संपवा संपवी मंत्री आहेत. त्यांनी सगळ्यांचा कार्यक्रम केला. शेतकऱ्यांचे वाटोळं केलं. नुसत्या घोषणा केल्या. करतो काय फोडाफोडी, काय गृहमंत्री आहे, असे म्हणत जरांगे पाटील यांनी फडणवीसांना टोला लगावला.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT