Manish Sisodia : राहुल गांधी, केजरीवाल अन् भाजप..! 570 दिवस जेलमध्ये राहिलेल्या सिसोदियांनी केले अनेक खुलासे

Rahul Gandhi BJP Delhi Liquor Scam Case : दिल्ली मद्य धोरण घोटाळाप्रकरणी मनीष सिसोदिया यांना सुप्रीम कोर्टाने नुकताच जामीन मंजूर केला आहे.
Arvind Kejriwal, Manish Sisodia, Rahul Gandhi
Arvind Kejriwal, Manish Sisodia, Rahul GandhiSarkarnama
Published on
Updated on

New Delhi : दिल्ली मद्य धोरण घोटाळाप्रकरणी माजी उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया तब्बल 570 दिवस तिहार जेलमध्ये होते. जामीनावर बाहेर आल्यानंतर ते पुन्हा राजकारणात सक्रीय झाले असून भाजपविरोध आणखी प्रखर झाला आहे. त्यांनी भाजपसह राहुल गांधी, अरविंद केजरीवाल यांच्याविषयीच्या चर्चांवर अनेक खुलासेही केले आहेत.

काँग्रेसचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी काही दिवसांपूर्वी ईडी आपल्याला अटक करणार असल्याचे सूचक ट्विट केले होते. त्यानंतर खळबळ उडाली होती. सिसोदिया यांनीही त्याला दुजोरा दिला आहे. राहुल गांधी नोटीस आली आहे. त्यामुळे भाजप त्यांना कधीही जेलमध्ये पाठवू शकते, असा दावा त्यांनी केला आहे. केजरीवाल, हेमंत सोरेन आणि मला जेलमध्ये पाठवण्यात आले, असे सिसोदिया म्हणाले.

Arvind Kejriwal, Manish Sisodia, Rahul Gandhi
Yogi Adityanath : पाकिस्तान नष्ट होणार की भारतात विलीन..! योगी आदित्यनाथ यांचा मोठा दावा

आघाडीवर थेटच सांगितलं

लोकसभेत काँग्रेस आणि आपने एकत्रितपणे भाजपचा सामना केला. पण विधानसभेत दोन्ही पक्ष पुन्हा वेगळे झाले आहेत. यावर बोलताना सिसोदिया म्हणाले, आघाडी होईल की नाही, हा पुढील विषय आहे. पण जेव्हा कोणत्याही पक्षाच्या नेत्याला जेलमध्ये टाकले जाते, तेव्हा संविधान आणि लोकशाही वाचवण्यासाठी सर्वांना एकत्रित येणे गरजेचे होते. ही लढाई सर्वांनी एकत्रित येऊन लढायला हवी.

केजरीवाल राजीनामा देणार का?

जेलमध्ये असलेल्या केजरीवालांनी राजीनामा देण्याची मागणी भाजपकडून केली जात आहे. त्यास सिसोदियांनी स्पष्ट शब्दांत नकार दिला. अशी कोणतीच शक्यता नसल्याचे सांगत ते म्हणाले, जनतेने पाच वर्षे सरकार चालवण्यासाठी निवडून दिले आहे. त्यामुळे कार्यकाळ पूर्ण करू. भाजपला तर पहिल्या दिवसापासून आमचे सरकार कोसळावे, असे वाटत आहे.

Arvind Kejriwal, Manish Sisodia, Rahul Gandhi
Muhammad Yunus : हिंदूंवर हल्ले होत असताना मोहम्मद यूनुस पहिल्यांदाच गेले मंदिरात; म्हणाले...

जेलमध्ये गेल्याने काम सोपे

दिल्लीत पुढील वर्षी निवडणुका होणार आहेत. त्यावर बोलताना सिसोदिया यांनी यावेळी मोठ्या मताधिक्याने विजय मिळेल, असा विश्वास व्यक्त केला आहे. मागील दोन निवडणुकांपेक्षा यावेळी अधिक जागा मिळवत आम्ही विजयी होऊ. आम्हाला जेलमध्ये टाकल्याने काम सोपे केले आहे. केवळ सत्ता मिळवण्यासाठी एका पक्षाला कशाप्रकारे रोखले जात आहे, हे जनता पाहत आहे. भाजपला जनताच दंड देईल, असे सिसोदिया यांनी सांगितले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com