Devendra Fadnavis, Manoj Jarange, Eknath Shinde Sarkarnama
महाराष्ट्र

Manoj Jarange On Eknath Shinde : 'एकनाथ शिंदेंना बोलू दिलं जात नाही', मुंबईला निघताना जरांगे पाटलांचा गौप्यस्फोट

Maratha Reservation Manoj Jarange Eknath Shinde : मनोज जरांगे पाटील हे मुंबईला रवाना झाले आहेत. मात्र, मुंबईला निघताना एकनाथ शिंदेंविषयी त्यांनी मोठा गोप्यस्फोट केला आहे.

Roshan More

Manoj Jarange News : मनोज जरांगे पाटील हे मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मुंबईकडे रवाना झाले आहेत. मुंबईला निघण्यापूर्वी पत्रकारांशी बोलताना त्यांनी मोठा गौप्यस्फोट केला आहे. मराठा आरक्षणाच्या मागणीवर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना बोलू दिले जात नसल्याचे जरांगे पाटील यांनी म्हटले.

जरांगे पाटील यांना मराठा आरक्षणाच्या संदर्भात एकनाथ शिंदे यांनी शपथ घेतली होती. मात्र ते आता आरक्षणाच्या बाबत काही बोलत नसल्याचा प्रश्न पत्रकारांनी विचारले असता ते म्हणाले, एकनाथ शिंदेंना बोलू दिलं जात नाही.

खरा माणूस हा एकनाथ शिंदे आहे त्याला गरिबांची व्यथा समजते. अजित पवारही चांगले नेतृत्व आहेत. त्यांच्याकडे गेले की गोरगरीबांची कामे करून देतात. भाजपमधील अनेक मंत्री देखील चांगले आहेत ते चांगल काम करतात, असे म्हणत जरांगे पाटील यांनी अप्रत्यक्ष मुख्यमंत्री फडणवीस यांच्यावर निशाणा साधला.

देवेंद्र फडणवीसांवर टीका

मनोज जरांगे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांवर टीका करताना म्हटले की, त्यांना आपली चूक झाकायची आङे त्यामुळे ते देवाला पुढे करतायेत. सरकारला सणाच्या काळात अशांतात निर्माण करायची आहे. आपण कायद्यानुसार उपोषण करणार आहोत. हिंदू सणाच्या दिवशी हिंदूलाच अडवले तर हिंदू विरोधी कोण? असा सवाल देखील त्यांनी केला.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT