Maratha Reservation: मनोज जरांगेंसाठी ठाकरेंचा खासदार मैदानात; ठणकावून सांगितलं, 'वैयक्तिक मागत नाही, आंदोलनात सहभाग..'

MP Sanjay Jadav Support to Manoj Jarange Patil : मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील हे मुंबईकडे निघाले आहेत. जरांगे पाटील मुंबईला जात असताना शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे खासदाराने त्यांना पाठींबा दिला आहे.
Thackeray MP backs Manoj Jarange for Maratha Reservation Protest
Thackeray MP backs Manoj Jarange for Maratha Reservation ProtestSarkarnama
Published on
Updated on

MP Sanjay Jadav News: मनोज जरांगे पाटील यांनी मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मुंबईकडे कूच केली आहे. 29 ऑगस्टपासून आपण आझाद मैदानावर बेमुदत उपोषण मनोज जरांगे करणार आहेत. या आंदोलनात लाखोच्या संख्येने मराठा बांधवांनी सहभागी होण्याचे आवाहन त्यांनी केली आहे.

भाजपचे नेते जरांगेवर टीका करत आहेत. मात्र, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे खासदार संजय जाधव यांनी जाहीरपणे आपण आंदोलनात सहभागी होणार असल्याचे जाहीर केले आहे.

चलो मुंबईची घोषणा देत संजय जाधव म्हणाले, जरांगे पाटलांची भूमिका ही समाजासाठी आहे आणि ती स्वागतार्ह आहे. त्या गोष्टीचे खासदार म्हणून मी समर्थन करतो. खासदार म्हणून मी देखील त्यांच्यासोबत आंदोलनात उतरणार आहे.'

कुठलीही अपेक्षा करू नका आणि उत्सुत्फूर्तेपणे जरांगे पाटलांच्या मागे उभे राहा, असे आवाहन देखील त्यांनी केले आहे. जरांगेवर टीका करणाऱ्या लक्ष्मण हाके आणि अ‍ॅड.गुणरत्न सदावर्ते यांच्यावर टीका करतान ते म्हणाले, काही लोकांचे भू भू सुरू आहे. जरांगे पाटलाच्या अंगावर घेत आहेत. पण अरे जरांगे पाटील वैयक्तिक काही मागत आहेत का तुम्हाला? असा सवाल देखील त्यांनी केला आहे.

Thackeray MP backs Manoj Jarange for Maratha Reservation Protest
Tribal Politics: आदिवासी बिऱ्हाड मोर्चा; आदिवासी आमदार एकवटले, उद्या मुंबईत मुख्यमंत्र्यांशी चर्चा!

सरकार घाबरले...

मनोजदादांनी जवळपास 4 महिन्यांपूर्वी तारीख घोषित केली होती, मात्र निघायचं असताना सरकारच्या माध्यमातून म्हणल्या जात आहे की, आंदोलनाला परवानगी नाही. याचाच अर्थ सरकार घाबरलय, असा टोला देखील संजय जाधव यांनी लगावला.

शरद पवारांच्या आमदाराचा पाठींबा

मनोज जरांगे पाटील यांचा आंतरवाली सराटी येथून मोर्चा निघाल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार संदीप क्षीरसागर यांनी मनोज जरांगे यांचा सत्कार केला. तसेच आपला जाहीर पाठींबा दिला. मोर्चामध्ये आपण देखील मुंबईला येणार असल्याचे त्यांनी जाहीर केले.

Thackeray MP backs Manoj Jarange for Maratha Reservation Protest
Maratha Reservation : "मुख्यमंत्र्यांच्या वतीने शिष्टमंडळ शिवनेरी येथे भेटीला येणार, काल रात्रीच मला फोन आलेला, तरीही..."; जरांगेंनी मराठा समाजाला केलं मोठं आवाहन

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com