Manoj Jarange Patil Sarkarnama
महाराष्ट्र

Manoj Jarange Patil : मोठी बातमी! मनोज जरांगे यांच्या उपोषणाला परवानागी नाकारली

Maratha Reservation Manoj Jarange Patil Hunger Strike : जरांगे पाटील यांच्या उपोषणाला अंतरवाली सराटी येथील काही ग्रामस्थांनी विरोध केला होता.

Roshan More

Maratha Reservation : मराठा आंदोलनाचा फटका सत्ताधारी भाजपला बसला आहे. त्यामुळे मराठा समाजाचा आरक्षणाचा प्रश्न कसा सोडवणार याची चर्चा सुरू झाली असताना मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणाला पोलिसांनी परवानगी नाकारली आहे.

8 जून पासून जरांगे पाटील अंतरवाली सराटी येथे उपोषण करणार होते. काही गावकऱ्यांनी त्यांच्या उपोषणाला विरोध करत निवदेन दिल्याने जरांगे पाटील यांना परवानगी नाकारल्याची माहिती आहे.

साम टीव्हीने दिलेल्या वृत्तानुसार जरांगे पाटील यांच्या उपोषणाला अंतरवाली सराटी येथील काही ग्रामस्थांनी विरोध केला होता. याबाबत त्यांनी गावकऱ्यांना निवेदन देखील दिले होते. मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणामुळे गावात कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो, असे गावकऱ्यांनी निवेदनात म्हटले होते.

ग्रामस्थांकडून देण्यात आलेल्या निवदेनावर अंतरावली सराटी गावच्या पाच ग्रामपंचायत सदस्यांसह उपसरपंचाची सह्या असल्याचे सांगितले जात आहे. त्यामुळे जरांगे यांचे उपोषण वादात सापडले होते.

उपोषणाच्या जागेबाबत ग्रामसभेची कोणतीही कागदपत्रे मनोज जरांगे पाटील यांनी सादर न केल्याने तसेच जातीय सलोखा बिघडण्याची शक्यता, ग्रामपंचायतीच्या कामात अडथळा आणि महिला आणि शालेय विद्यार्थ्यांना होणारा त्रास लक्ष्यात घेत पोलिसांनी जरांगे पाटील यांच्या उपोषणला परवानगी नाकारल्याचे सांगितले जात आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT