Maratha Reservation Manoj Jarange Patil Sarkarnama
महाराष्ट्र

Maratha Vs OBC : मराठा विरुद्ध ओबीसी वाद पुन्हा पेटणार! 'आम्हीच शांत का बसावं', मनोज जरांगे पाटलांचा इशारा

Manoj Jarange patil Maratha Vs OBC Maratha Reservation : मराठा समाजाचा आक्रोश सरकारला समजून घ्यावे लागणार आहे. अन्यथा सरकारला रोषाला समोर जावे लागणार आहे, असे मनोज जरांगे म्हणाले.

Roshan More

Manoj Jarange patil News : मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण मिळाले पाहिजे, या मागणीवर मनोज जरांगे-पाटील ठाम आहेत. 'किती दिवस शांत राहायचे आम्ही. मराठ्यांच्या हक्काचे आरक्षण त्यांना द्यावे लागणार आहे. ते घेतल्या शिवाय आम्ही शांत बसणार नाही.', असा इशारा मनोज जरांगे पाटील यांनी सरकारला दिला.

आम्हाला आरक्षण मिळणार आणि ते ओबीसीतूनच मिळवणार. मराठा समाजाचा आक्रोश सरकारला समजून घ्यावे लागणार आहे. अन्यथा सरकारला रोषाला समोर जावे लागणार आहे, असे देखील जरांगे पाटील यांनी ठणकावून सांगितले. मनोज जरांगे पाटील यांनी हिंगोलीत शांतता रॅली काढून सरकारला इशारा दिला.

मराठा स्वतःच्या लेकरांसाठी पेटून उठला आहे. मराठ्यांचा न्यायासाठी आक्रोश आहे. हा आक्रोश समजून घ्या. ओबीसीच्या एका नेत्याचे ऐकूण करोडो मराठा समाजावर अन्याय केला तर याचे परिणाम येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत भोगावे लागतील.

ओबीसीचे नेते आंदोलन करतायेत, या प्रश्नावर जरांगे पाटील म्हणाले, त्याला आम्ही काय करू. आमच्या हक्काच्या आरक्षण आम्ही मागतोय. आमच्या नोंदी आहेत, गॅझेट आहेत. मराठा आणि कुणबी एकच आहे. तुमची पोट जात ओबीसी म्हणून चालत असेल तर मराठ्यांची पोटजात कुणबी म्हणून का चालत नाही, असा आमचा सरकारला सवाल आहे. ते जर त्यांच्या जातीसाठी कट्टर असतील तर मी देखील माझ्या जातीसाठी कट्टर आहे, असे जरांगे म्हणाले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT