Video Ravindra Waikar : मोठी बातमी! खासदार रवींद्र वायकरांना 'क्लीन चिट', 'तो' गुन्हा गैरसमजातून दाखल

Ravindra Waikar Clean chit Plot Scam : लोकसभा निवडणुकीच्या आधी रवींद्र वायकर यांच्यावर भूखंड घोटाळ्याचे आरोप झाले होते. या प्रकरणी त्यांची चौकशीदेखील सुरू होती. त्यावेळी त्यांनी ठाकरे गटातून शिंदे गटात प्रवेश केला होता
Ravindra Waikar
Ravindra WaikarSarkarnama
Published on
Updated on

Ravindra Waikar News : जोगेश्वरी भूखंड घोटाळ्या प्रकरणी गुन्हा दाखल झालेले खासदार रवींद्र वायकर यांना आर्थिक गुन्हे शाखेने 'क्लिन चीट' दिली आहे. मुंबई महानगरपालिकेकडून दाखल करण्यात आलेली तक्रार गैरसमजातून करण्यात आल्याचे 'क्लीन चिट'मध्ये म्हटले आहे. रवींद्र वायकर यांच्या विरोधातील सर्व गुन्हे मागे घेतल्याची माहिती आहे.

लोकसभा निवडणुकीच्या आधी रवींद्र वायकर यांच्यावर भूखंड घोटाळ्याचे आरोप झाले होते. या प्रकरणी त्यांची चौकशी देखील सुरू होती. त्यावेळी त्यांनी ठाकरे गटातून शिंदे गटात प्रवेश केला होता. शिंदे गटाकडून त्यांना खासदारकीचे तिकीट देखील देण्यात आले होते. त्यांनी ठाकरे गटाचे उमेदवार अमोल किर्तीकर यांचा पराभव करत विजय मिळवला होता.

रवींद्र वायकर Ravindra Waikar हे ठाकरे गटात असताना त्यांच्यावर भाजप नेते किरीट सोमय्यांनी भूखंड घोटाळ्याचा आरोप केला होता. या आरोपानंतर जानेवारी 2023 मध्ये वायकर यांच्या घरावर ईडीकडून छापा मारण्यात आला होता. वायकर यांची ईडीकडून चौकशी देखील सुरू होती.

Ravindra Waikar
Narendra Modi : नरेंद्र मोदींबाबत काँग्रेसच्या नेत्याचा मोठा दावा; म्हणाले, 2027 मध्ये...

वायकर यांनी महापालिकेचा राखीव भूखंड लाटून तेथे पंचतारांकीत हाॅटेल बांधण्या घाट घातला होता. त्यासाठी कोट्यवधींचा घोटाळा केल्याचा गंभीर आरोप किरीट सोमय्या यांनी केला होता. भूखंड घोटाळ्या प्रकरणी मुंबई महापालिकेकडून आझाद मैदान पोलिस Police ठाण्यात तक्रार देण्यात आली होती. त्यानुसार वायकर यांच्यावर गु्न्हा देखील दाखल करण्यात आला होता.

आरोप झालेल्या भूखंड घोटाळ्या प्रकरणी आर्थिक गुन्हे शाखेच्या वतीने क्लोजर रिपोर्ट सादर करण्यात आला आहे. रवींद्र वायकर यांच्यासह त्यांच्या पत्नी मनिषा आणि आणखी चौघा जणांना क्लिन चिट देण्यात आली आहे. तसेच वायकर यांच्यावरील सर्व गुन्हे देखील मागे घेण्यात आले आहे.

Ravindra Waikar
Kishore Darade Politics: "एकनाथ शिंदे हे तर देव", दुसऱ्यांदा आमदार झालेल्या दराडेंना साक्षात्कार

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com