Manoj Jarange Patil  sarkarnama
महाराष्ट्र

Manoj Jarange Patil Protest : मनोज जरांगे पाटील यांचा फक्त एक आवाज, पाठींब्यासाठी आमदार-खासदारांची रांग

MP MLA Support Manoj Jarange Patil : मनोज जरांगे पाटील यांनी मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मुंबईकडे कूच केली आहे. जरांगे पाटील यांना पाठींबा देण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना, काँग्रेसमधील नेत्यांच्या रांगा लागल्या आहेत.

Roshan More

Maratha Reservation News : मनोज जरांगे-पाटील यांनी मुंबईला निघण्यापूर्वी ही शेवटची लढाई आहे, असे म्हणत आमदार-खासदार यांनी देखील मैदानात उतरावे असे आव्हान केले होते. समाज सगळं बघतोय श्रीमंत-गरीब मराठ्यांनी शेवटच्या लढाईसाठी एकत्र यावं असे देखील ते म्हणाले. मी 288 आमदारांना फोन केला होता आणि बघतो कोण कोण येतंय, असे देखील ते म्हणाले. लोकप्रतिनिधींना आंदोलनात सहभागी होण्याचे जरांगेंनी आव्हान करताच त्यांना पाठींबा देण्यासाठी राजकीय नेत्यांची रांग लागली आहे.

मनोज जरांगे यांचा मोर्चा मुंबईला निघण्यापूर्वीच परभणीचे खासदार संजय जाधव यांनी जरांगे यांना पाठींबा देत असल्याचे जाहीर करत 'चलो मुंबई'ची हाक दिली होती. तर, बीडचे आमदार संदीप क्षीरसागर यांनी देखील पाठींबा देत ते जरांगे हे आंतरवालीमधून मुंबईकडे निघत असताना आंतरवालीमध्ये हजर होते. ते देखील मोर्चात सहभागी झाले.

खासदार सोनवणे यांचा पाठींबा

मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाला बजरंग सोनवणे यांनी पाठींबा दिला आहे. मुंबईला निघण्याआधी जरांगे यांनी बीडमधील बालाघाट मांजरसुंबा येथे सभा घेतली होती. ते सभेला बजरंग सोनवणे उपस्थित राहिले होते. गेवराईचे आमदार विजयसिंह पंडित यांनी देखील जरांगे पाटील हे मुंबईला निघण्याआधीच 'चलो मुंबई'चे बॅनर सोशल मीडियावर शेअर करत पाठींबा दिला होता. तर माजलगावचे आमदार प्रकाश सोळंके यांनी देखील पाठींबा देत आंदोलनात सहभागी होणार असल्याचे सांगितले होते.

सरकारने शब्द पाळावा...

खासदार ओम राजेनिंबाळकर यांनी सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत सरकारने मनोजदादांना दिलेला शब्द तातडीने पाळावा, असे म्हणत पाठिंबा दिला आहे. तसेच मराठा समाजाच्या हक्कासाठी मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली आझाद मैदान येथे आंदोलन होणार असे म्हटले आहे. तर, गरजवंत मराठ्यांच्या लढ्यासाठी मी येतोय तुम्ही पण या, असे आवाहन आमदार कैलास पाटील यांनी केले असून ते देखील आंदोलन सहभागी होणार आहेत. त्यांनी देखील जरांगे पाटील यांना पाठींबा जाहीर केला आहे.

काँग्रेस नेत्यांचा पाठींबा

काँग्रेसमधील नेत्यांनी देखील मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाला पाठींबा दिला आहे. जालन्याचे खासदार कल्याण काळे यांनी मुंबईकडे जरांगे पाटील यांची भरपावसात पैठण येथे भेट घेऊन आंदोलनास पाठींबा दिला. तसेच समाजाच्या हक्कासाठी चाललेल्या या संघर्षात आम्ही सदैव दादांसोबत खंबीरपणे उभे राहू, असे म्हटले आहे. तसेच काँग्रेसचे तालुका तसेच जिल्हास्तरावरील नेते देखील या आंदोलनात सहभागी झाले आहेत.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT