Manoj Jarange Patil Sarkarnama
महाराष्ट्र

Manoj Jarange Patil : मराठा आंदोलकांना मनोज जरांगे पाटील यांनी सुनावले, 'देवेंद्र फडणवीसांची सुपारी घेतल्यासारखे...'

Manoj Jarange Patil maratha reservation : राज्यात मराठ्यांचे आंदोलन सुरू नाही. विनाकारण कोणी फडणवीस साहेबांची सुपारी घेतल्या सारखं अभियान सुरू केलं, असे मनोज जरांगे पाटील म्हणाले.

Roshan More

Manoj Jarange Patil News : राज ठाकरे हे धाराशिवमध्ये असताना मराठा आंदोलकांनी त्यांच्या हाॅटेलमध्ये घुसून गोंधळ घातला. राज ठाकरेंच्या विरोधात घोषणाबाजी केली. बीडमध्ये राज ठाकरेंच्या गाडीवर सुपारी फेकण्यात आली. आज (रविवारी) ज्येष्ठ नेते शरद पवार यांची गाडी मराठा आंदोलकांनी अडवली. राज्यात ठिकठिकाणी मराठा आंदोलक नेत्यांच्या विरोधात आक्रमक होताना दिसत आहेत. मात्र, या आंदोलकांना मनोज जरांगे पाटील यांनी सुनावले आहे.

'राज्यात मराठ्यांचे आंदोलन सुरू नाही. विनाकारण कोणी फडणवीस साहेबांची सुपारी घेतल्या सारखं अभियान सुरू केलं. या षडयंत्रात सामील होऊन विनाकारण रॅली काढणे, यात्रा काढणे, जाब विचारणे हे बंद करा.', या शब्दांत मनोज जरांगे पाटील यांनी आंदोलन करणाऱ्यांना सुनावले.

'समाजात ताकद आहे. समाज मुंबईत जाऊन जाब विचारू शकतो. असं थोडचं हे समाज विचारू शकत नाही म्हणून तु्म्ही विचारत आहात. आंदोलनाला कोणीही गालबोट लावू नये. समाज नको म्हणत असेल तरी ते करत असाल तर त्यांना देखील समाजापुढे यायचे आहे.', असे म्हणत जरांगे पाटील Manoj Jarange Patil यांनी आंदोलन करणाऱ्यांना इशाराच दिला.

आरक्षणावरून राज ठाकरेंना सुनावले

आर्थिक निकषावर आरक्षण असावे, असे म्हणणाऱ्या राज ठाकरे यांना जरांगे पाटील यांनी प्रत्युत्तर दिले. 'आरक्षणाची गरज त्यांना नाही पण गोरगरीबांना आहे. राज ठाकरे यांनी त्यांचे विचार लोकांवर लादू नये. श्रीमंतांना, एसीत बसणाऱ्यांना आरक्षणाच्या किंमत कळणार नाही. एखाद्या गरीब विद्यार्थ्याला विचारा त्याला आरक्षण हवे की नको मग मला सांगा', असे राज ठाकरे म्हणाले.

राणे फडणवीसांच्या चपला वाहतात

मनोज जरांगे पाटील यांना मोहम्मद अली जीना म्हणत निलेश राणे यांनी टीका केली होती. या टीकेला जरांगेंनी जोरदार प्रत्युत्तर दिले. 'ते त्यांचे शब्द नाहीत. ते देवेंद्र फडणवीस Devenra Fadanvis यांचे आहेत. ते फडणवीस साहेबांच्या चपला वाहायला लागलेत. मर्द दाढी ठेवतात. हे त्यांना कळणार नाही.', असा टोला जरांगे पाटलांनी राणेंना लगावला.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT