Manoj Jarange Patil : राज ठाकरे म्हणतात आर्थिक निकषावर आरक्षण, मनोज जरांगेंनी दिले प्रत्युत्तर 'तुमचे विचार...'

Raj Thackeray Manoj Jarange Patil maratha reservation : राज ठाकरे यांच्या गाडीवर झालेल्या हल्ला प्रश्न मनोज जरांगे पाटील म्हणाले, राज्यात मराठा समाजाचे कोठेही आंदोलन सुरू नाही. राज्य शांत आहे आणि शांतच राहणार आहे.
Raj Thackeray manoj Jarange Patil.
Raj Thackeray manoj Jarange Patil.sarkarnama
Published on
Updated on

Manoj Jarange Patil News :मराठा आंदोलकांच्या विरोधाला राज ठाकरे यांना सामोरे जावे लागत आहे. राज ठाकरे यांनी संभाजीनगरमध्ये आरक्षणा विषयी आपली भूमिका स्पष्ट केली. 2006 पासून आपली भूमिका ही आर्थिक निकषावर आरक्षण असावे, असे राज ठाकरे म्हणाले. ठाकरेंच्या या वक्तव्याला मनोज जरांगे पाटील यांनी प्रत्युत्तर दिले आहे.

'आरक्षणाची गरज त्यांना नाही पण इतरांना आहे. गोरगरीबांना गरज आहे. श्रीमंत, एसीत बसणाऱ्यांना आरक्षणाच्या किंमत कळणार नाही. तुमचे विचार लोकांवर लादू नका.', असे मनोज जरांगे पाटील राज ठाकरेंना उद्देशून म्हणाले.

राज ठाकरे यांच्या गाडीवर झालेल्या हल्ला प्रश्न मनोज जरांगे पाटील म्हणाले, राज्यात मराठा समाजाचे कोठेही आंदोलन सुरू नाही. राज्य शांत आहे आणि शांतच राहणार आहे. महाराष्ट्राला सांगतोय आपल्या मराठ्यांचे आंदोलन सुरू नाही. जे बोलतोय ते स्पष्ट बोलतोय.

Raj Thackeray manoj Jarange Patil.
Shivsena UBT Vs MNS : मनसे अन् ठाकरे गटाच्या राड्यात शिंदे गटाची उडी, डिवचत म्हणाले...

मर्द दाढी ठेवतात

मनोज जरांगे पाटील यांची दाढी ही मोहम्मद अली जीना यांची दाढी आहे. ते शिवरायांच्या मावळ्याची दाढी नाही, अशी टीका नितेश राणे यांनी मनोज जरांगे यांच्यावर केली होती. या टीकेला उत्तर देताना जरांगे पाटील म्हणाले, ते त्यांचे शब्द नाहीत. ते देवेंद्र फडणवीस यांचे आहेत. ते फडणवीस साहेबांच्या चपला वाहायला लागलेत.मर्द दाढी ठेवतात. हे त्यांना कळणार नाही.

जरांगे यांच्या आडून ठाकरे, पवार यांचे राजकारण

राज ठाकरे संभाजीनगरमधील आपल्या पत्रकार परिषदेमध्ये म्हणाले होते की, मनोज जरांगे-पाटील यांच्या आडून शरद पवार, उद्धव ठाकरे यांना राजकारण करायचे आहे. जातीमध्ये विद्वेष पसरवून यांना राजकारण करायचे आहे. मराठा समाजाने, ओबीसी समाजाने, इतर जातींनी यांच्या नादी लागू नये, असे देखील राज ठाकरे म्हणाले.

Raj Thackeray manoj Jarange Patil.
Lahu Kanade And Girish Mahajan : आमदार कानडे भाजप नेते महाजनांच्या स्वागताला; काँग्रेस श्रेष्ठींनी डोळे वटारले?

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com