Manoj Jarange Patil, Devendra Fadnavis Sarkarnama
महाराष्ट्र

Manoj Jarange Patil Video : 'दोन दिवसात मार्ग काढा नाही तर...' जरांगेंचा पुन्हा एकदा सरकारला अल्टिमेटम

Manoj Jarange Patil Government Ultimatum : तरूणाच्या मृत्यूनंतर जरांगे पाटील सरकारवर चांगलेच संतापले आहेत. संयम सुटला तर आम्हाला राज्यात वेगळं आंदोलन करावा लागेल. जरांगे-पाटलांचा पुन्हा एकदा सरकारला अल्टिमेटम दिला आहे.

Rashmi Mane

Manoj Jarange Patil : विधानसभा निवडणुका पार पडल्यानंतर राज्यात पुन्हा मराठा आरक्षणाचा मुद्दा चांगलाच पेटला असताना. छत्रपती संभाजीनगरमध्ये एका तरूणानं आपलं आयुष्य संपवलंय. शेततळ्यात उडी मारून तरूणानं आरक्षणासाठी जीव दिलाय. या तरूणाच्या मृत्यूनंतर जरांगे पाटील सरकारवर चांगलेच संतापले आहेत. संयम सुटला तर आम्हाला राज्यात वेगळं आंदोलन करावा लागेल. जरांगे-पाटलांचा पुन्हा एकदा सरकारला अल्टिमेटम दिला आहे.

'या घटनेनंतर सरकारला काहीच वाटत नाही का? गोर गरीबांची लेकरं आत्महत्या करीत आहेत. मुख्यमंत्री साहेब तुम्हाला किती बळी घ्यायचेत. असं मनोज जरांगे पाटील मीडियाशी संवाद साधत म्हणाले.

मंगवारी, बुधवारी ज्या मागण्या झाल्यात गॅझेटच्या त्या पटकन लागू करा, शिंदे समितीला कशाला बसवून ठेवलं आहे तिथे, जाणून बुजून काम करतं नाहीत, तुमच्यामुळे आमच्या लेकरं आत्महत्या करत आहेत. तुम्ही फक्त देतो म्हणता आणि देत नाही.

'मुख्यमंत्र्‍यांना आणखी किती किती बळी हवे आहेत? सरकार भावना शून्य आहे. या आत्महत्या राजकारणासाठी होत नाहीत. तर त्यांच्या नोकरीसाठी होत आहेत'. लेकरांच्या आत्महत्या थांबवायच्या असतील तर या आरक्षणाबाबतचा लवकर निर्णय घ्या. तुम्ही जर मजा बघत असाल तर तुम्हाला फळं भोगावी लागतील, असा इशाराच मनोज जरांगे पाटील यांनी दिला आहे.

आत्महत्या करू नका आपण लढू, असं भावनिक आवाहन केलं आहे.

माझे लेकरं मरायला लागलीत तुम्ही निर्णय दिला नाही. जाणून बुजून मराठ्यांना वेठीस धरू नका. नाही तर आम्हाला आंदोलन उग्र स्वरूपात करावा लागेल. मराठा बांधवांना विनंती आहे. आरक्षण १०० टक्के मिळणार आहे. समाजासाठी मी कायम काम करणार आहे. जिव्हारी लागेल असं कुणीच काही करू नका. बीड, जालन्यात मराठा आरक्षणासाठी तरूण वर्ग आत्महत्या करीत आहेत. कृपया करून आत्महत्या करू नका. आपण लढू. थोडासा विचार करा. आरक्षण मिळेपर्यंत मी हटणार नाही', असं मनोज जरांगे पाटील म्हणालेत.

SCROLL FOR NEXT