Manoj Jarange Sarkarnama
महाराष्ट्र

Maratha Reservation News : आरक्षणाच्या भूमिकेवर मनोज जरांगे ठाम; अपक्ष उमेदवार लोकसभेच्या रिंगणात उतरविणार!

Sachin Waghmare

Manoj jarange News : मराठा समाजाच्या आरक्षणाच्या मुद्द्यावरून राज्यातील वातावरण चांगलेच तापले आहे. सग्या सोयऱ्याचा अध्यादेश जारी करून मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गातून आरक्षण मिळावे, या मागणीसाठी राज्यात मराठा समाज आक्रमक झाला आहे. आरक्षणाच्या भूमिकेवर ठाम असलेल्या मराठा समाजाकडून जालना जिल्ह्यातील अंतरवाली सराटी गावामध्ये आरक्षणाची पुढील भूमिका ठरवण्यासाठी लाखो मराठा समाजाच्या उपस्थित बैठक पार पडली.

या बैठकीत मराठा समाजाकडून राज्यात लोकसभा निवडणुकीत एकच अपक्ष उमेदवार रिंगणात उतरवण्याचा निर्णय घेण्यात आला. त्याचं बरोबर हा निर्णय घेताना गावागावांत बैठक घेऊन इतर पक्षाचे ज्याप्रमाणे सर्वेक्षण करण्यात आले. (Maratha Reservation News )

मराठा समाजाचे सर्वेक्षण 30 मार्चपर्यंत करण्याचा निर्णय घेण्यात आला. 30 मार्चनंतर मराठा समाज लोकसभा निवडणुकीबाबत निर्णय घेणार आहे.

रविवारी पार पडलेल्या बैठकीनंतर मराठा समाजाकडून गावागावांत सर्वेक्षणाचे काम सुरू करण्यात आले आहे. या सर्वेक्षणाचा फॉर्म आता हाती आला असून, या सर्वेक्षणादरम्यान आठ प्रश्न विचारण्यात आली आहेत. त्यामुळे हे सर्वेक्षण पूर्ण झाल्यानंतर मराठा समाज कोणकोणत्या मतदारसंघातून आपले उमेदवार उभे करणार हे पाहणं महत्त्वाचे ठरणार आहे.

नेमका कसा आहे हा सर्वेक्षण अर्ज...

1. मराठा योद्धा मनोज जरांगे पाटील यांनी राजकारणात यावे का?....होय/नाही

2. मराठा समाजाने येणारी लोकसभा निवडणूक लढवावी का.?....होय/ नाही

3. लोकसभा निवडणूक (Lok Sabha Election ) प्रत्येक जिल्ह्यातून एक अपक्ष उमेदवार ‌द्यावा का.?....होय/ नाही

4. प्रत्येक गावातून दोन उमेदवार योग्य का?....होय/नाही

5. कोणत्याही राजकीय एका पक्षाला आपण पाठिंबा देणे योग्य का.?...होय/नाही

6. आपल्या कुटुंबातील एकूण मतदारांची संख्या किती ?.... संख्या

7. आरक्षण प्रश्न मार्गी लावणारा कोणत्याही जाती धर्माचा उमेदवार चालणार का.?...होय/नाही किंवा फक्त मराठा

8. जिल्ह्यातून लोकसभा मराठा समाजाच्या (Maratha Reservation) निश्चित उमेदवार यांना तुम्ही मतदान करणार का.?...होय/नाही

हे आठ प्रश्न प्रमुख्याने विचारण्यात आले आहेत. त्याशिवाय अभिप्रायासाठी एक ओळ सोडण्यात आली आहे.

R

SCROLL FOR NEXT