Pune News: आगामी लोकसभा निवडणुकीमध्ये बारामती मतदारसंघातून उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांच्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांची शिवसेना डोकेदुखी वाढवणार असल्याचे जवळपास निश्चित झाले आहे. बारामती लोकसभा मतदारसंघातून (Baramati Lok Sabha Constituency 2024) शिवसेनेचे नेते विजय शिवतारे यांनी अपक्ष निवडणूक लढण्याचा निर्णय घेतला आहे.
निवडणूक अर्ज भरण्याची तारीख ही जाहीर केली आहे. शिवतारे यांचे हे बंड थंड करण्याचा प्रयत्न महायुतीच्या नेत्यांकडून करण्यात येत असतानाच खडकवासला मतदारसंघातील शिंदे सेनेने अजित पवारांनी विरोधात बंडाचे निशान फडकावले आहे. त्याबाबतचा व्हाॅट्सअॅप मेसेज वायरल होत आहे.
लोकसभा निवडणुकीच्या निमित्ताने बारामती लोकसभा मतदारसंघात हाय व्होल्टेज ड्रामा पाहायला मिळत आहे. महायुतीतील नेत्यांनीच एकामेकांना विरोधात दंड थोपटल्याचे चित्र सध्या पाहायला मिळत आहे. एकीकडे पवार कुटुंबीयांना आव्हान देत माजी आमदार विजय शिवतारे यांनी अपक्ष निवडणूक लढण्याचा निर्धार केला आहे, तर दुसरीकडे इंदापूरमधून विधानसभेचा शब्द घेतल्याशिवाय लोकसभेचे काम करणार नाही, असा पवित्रा माजी मंत्री हर्षवर्धन पाटलांनी घेतल्याचं पाहायला मिळालं.
(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)
त्यामुळे बारामतीमधील हा वाद मिटवण्यासाठी काल रात्री उशिरापर्यंत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सागर बंगल्यावरती खलबतं रंगली. फडणवीस यांनी वादावर पडदा टाकण्यासाठी हर्षवर्धन पाटील यांच्या समवेत रात्री उशिरापर्यंत चर्चा केली. त्यानंतर लोकसभेच्या प्रचाराच्या कामाला लागण्याचे निर्देश हर्षवर्धन पाटलांना फडणवीस यांनी दिले.
दरम्यान, इंदापूर आणि पुरंदरमधून मित्रपक्षातील नेत्यांनी अजित पवार विरोधात दंड थोपटल्याने अजित पवारांना खडकवासल्यामधील मताधिक्य अत्यंत आवश्यक असणार आहे. अशातच खडकवासला विधानसभा मतदारसंघातील शिवसेना शिंदे गटाच्या व्हाॅट्सअॅप ग्रुपमध्ये काही मेसेज वायरल होत आहेत. हे मेसेज अजित पवारांची डोकेदुखी वाढवणारे ठरू शकतात.
खडकवासला विधानसभा मतदारसंघातील शिवसेनेला विचारात घेत नसल्याने शिवसैनिक नाराज आहेत. बारामती लोकसभा मतदारसंघाचा प्रचार करायचा नसून पुणे लोकसभेतील मुरलीधर मोहोळ यांचा प्रचार करूया, असा मेसेजच शिवसेना पदाधिकारी आणि शिवसैनिकांना येत आहे. हा मेसेज शिवसेनेच्या एका व्हाॅट्सअॅप ग्रुपवर व्हायरल झाला आहे.
"शिवसेना खडकवासला मतदारसंघातील शिवसेनेचे सर्व पदाधिकारी पुणे लोकसभा मा. मुरलीधर मोहोळ यांच्यासाठी काम करेल. बारामती लोकसभा मतदारसंघात इतर कोणत्याही पक्षाला शिवसेनेची गरज नसल्यामुळे शिवसेना संपूर्ण ताकदीने पुणे लोकसभेसाठी काम करेल. पुढील बैठक उद्या दुपारी शिवसेना भवन येथे घेऊन पुणे लोकसभेसाठी आपण सर्व जबाबदारी वाटून घेऊ."
R
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.