Manoj Jarange targets Eknath Shinde Sarkarnama
महाराष्ट्र

Manoj Jarange Warning : देवेंद्र फडणवीसांविषयी काय बोलला सांगू का? एकनाथ शिंदेंच्या मंत्र्याला मनोज जरांगेंचा जाहीर इशारा

Manoj Jarange Warning Bharat Gogawale : मनोज जरांगे पाटील यांनी एकनाथ शिंदेंचे मंत्री भरत गोगावले यांना जाहीर इशारा दिला आहे.

Roshan More

Manoj Jarange News : मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषण सुरू आहे. त्यांनी आपल्या उपोषणादरम्यान सत्ताधारी भाजप आणि शिवसेनेवर टीका केली आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे देखील जरांगेंच्या निशाण्यावर आहेत. जरांगे पाटलांना आम्ही जशाच तसे प्रत्युत्तर देऊ, असा इशारा मंत्री भरत गोगावले यांनी दिला आहे.

गोगावले यांच्या इशाऱ्यानंतर मनोज जरांगे यांनी देखील उत्तर दिले आहे. ते म्हणाले, आम्ही तयार आहे, सज्ज आहे. आम्ही कधीही तयार आहे. देवेंद्र फडणवीसांविषयी तुमची काय खदखद आहे ती सांगू का मीडियात? माझ्या नादी नाही लागायचे, मला बोलले आहात तुम्ही.

नेत्यांबद्दल एकेरी भाषेत बोलू नये, असे मंत्री उदय सामंत हे जरांगेंना उद्देशून म्हणाले होते. त्यावर बोलताना जरांगे पाटील म्हणाले,' चुकीच्याला चुकीच म्हणू नको का? आम्हाला तुम्ही दलाल म्हणून बोलायला ठेवलं आहे का? तुमच्या मनगटात फक्त पैशाची ताकद आहे. एकनाथ शिंदेंबद्दल बोललो तर तुम्हाला वाईट वाटलं, पण शिरसाठ्याचं ऐकुण आमची प्रमाणपत्र रद्द का केली?'

शिंदेनी मागेपुढे पाहिले नाही...

मंत्री भरत गोगावले म्हणाले, 'आमची भूमिका एक आहे, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीससाहेब, एकनाथ शिंदेसाहेब असतील त्यांनी मराठ्यांना आरक्षण दिलं, याआधी फडणवीस हे मुख्यमंत्री होते तेव्हा त्यांनी १० टक्के आरक्षण दिले. पुढे शिंदे समिती नेमली, हैद्राबाद गॅझेट दिलं जे मराठ्यांसाठी योग्य होते ते देताना एकनाथ शिंदेसाहेबांनी कधी मागे पुढे पाहिले नाही.'

जशास तसे उत्तर देऊ...

'मराठा आरक्षणासाठी जरांगे जे बोलतायेत ते योग्य आहे. मात्र, ते जेव्हा आमचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, नेत्यांवर बोलतील त्यावेळी आम्ही सहन करणार नाही. सगळं व्यवस्था चालू आहे. मात्र, आरक्षण सोडून जरांगे पाटील राजकारणावर बोलत असतील तर त्याला जशास तसे उत्तर देण्यासाठी आम्ही देखील मराठे आहोत.', असा इशारा देखील भरत गोगावले यांनी दिला.

SCROLL FOR NEXT