Manoj Jarange Hunger Strike : जरांगे पाटलांना भेटणार, 24 तासात योग्य निर्णय घेणार; मंत्री उदय सामंताचे मोठे विधान

Manoj Jarange Latest News : उद्योग मंत्री उदय सामंत यांनी येत्या 24 तासात जरांगे पाटलांना भेटून योग्य निर्णय घेणार असल्याचे विधान प्रसार माध्यमाशी बोलताना केले.
uday samant, manoj jarange
uday samant, manoj jarange Sarkarnama
Published on
Updated on

Mumbai News : अंतरवाली सराटीत मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी शनिवारपासून मराठा समाजाच्या विविध मागण्यासाठी आमरण उपोषण सुरु केले आहे. रविवारी त्यांच्या उपोषणाचा दुसरा दिवस आहे. त्यातच रविवारी परभणीत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थित शिवसेनेचा मोठा शेतकरी मेळावा पार पडला. हा मेळावा रद्द करावा, अशी मागणी मनोज जरांगे पाटील यांनी खासदार संजय जाधव त्यांच्याकडे केली होती. मात्र, खासदार जाधव यांनी मेळावा रद्द करण्यास नकार दर्शवत जरांगे यांची माफी मागितली होती. त्यामुळे रविवारी दिवसभर वातावरण तापले होते. त्यातच आता उद्योग मंत्री उदय सामंत यांनी येत्या 24 तासात जरांगे पाटलांना भेटून योग्य निर्णय घेणार असल्याचे विधान प्रसार माध्यमाशी बोलताना केले. त्यामुळे उद्यापासून राज्य सरकार व जरांगे पाटलांमध्ये चर्चा होऊन त्यामधून मार्ग काढला जाईल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

प्रसार माध्यमाशी बोलताना उदय सामंत म्हणाले, मनोज जरांगे हे माझे मित्र आहेत. आमचे संबंध राजकारणाच्या आंदोलनाच्या पलीकडचे आहेत. म्हणूनच मी त्यांना विनंती करीत आहे की, कोणाच्या गैरसमजामधून एकनाथ शिंदे यांच्याबद्दल वाईट बोलू नये. जरांगे यांचा उपोषणाचा कार्यक्रम आहे म्हणून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा मेळावा आयोजित केलेला नव्हता. दोन महिन्यांपासूनच हा युवा संवाद आणि शेतकरी मेळावा आयोजित करण्यात आला होता. 7 जुलैला हा कार्यक्रम होता मात्र एकनाथ शिंदे आजारी असल्यामुळे त्या दिवशी हा कार्यक्रम होऊ शकला नाही, असे सामंत यांनी स्पष्ट केले.

मनोज जरांगे पाटील यांची उद्या किंवा परवा मी भेट घेणार आहे. पुढच्या 24 तासात योग्य निर्णय घेणार आहे. राज्य सरकार मराठा समाजाच्या मागण्यांसोबत आहे. मागण्या पूर्ण व्हाव्यात, यासाठी मी जरांगे यांच्या संपर्कामध्ये आहे. जरांगे पाटलांनी एकनाथ शिंदेंबद्दल वाईट बोलू नये व तात्यांच्या विषयी झालेला गैरसमज दूर करण्याचा प्रयत्न करणार आहे. मराठा समाजाला कमी लेखण्याचा कोणताही प्रयत्न शेतकरी मेळाव्यामधून झालेला नाही. मराठा आरक्षणाच्या संदर्भात शंका निर्माण करण्यासाठी हा कार्यक्रम घेतला नव्हता. मराठी समाजाला कमी लेखण्याचा प्रयत्न शेतकरी मेळाव्यामधून झालेला नाही, असेही सामंत म्हणाले.

uday samant, manoj jarange
Jarnge Warning to Shinde : शिंदेसाहेब, तुमच्या मंत्र्यांना आवर घाला; नाही तर पक्ष उघड्यावर पडेल : जरांगेंची एकनाथ शिंदेंना पुन्हा वार्निंग

मनोज जरांगे यांनी खासदार जाधव यांना फोन केला. त्यावेळेला हजारो लोक जमले होते. शिंदे साहेबांना हा मेळावा करावा लागल्याचे सामंत म्हणाले. एकनाथ शिंदे यांचा शनिवारीच फोन आला होता. त्यावेळी एकनाथ शिंदेंनी मला सांगितले होते, आंदोलन होत राहील, त्यांच्या मागण्या देखील मान्य होतील. परंतू जरांगे यांनी आपल्या प्रकृतीची देखील काळजी घेतली पाहिजे असे सामंत म्हणाले.

uday samant, manoj jarange
Jadhav apologized Jarange : संजय जाधवांनी मागितली जरांगे पाटलांची जाहीर माफी : माझ्यावर बोलण्याचा तुम्हाला नैतिक अधिकार; भावना दुखावल्या असतील तर...

खासदार संजय जाधव यांनी देखील वेळोवेळी मनोज जरांगे यांचे समर्थन केले आहे. एकनाथ शिंदे जरांगे यांच्या प्रकृतीची काळजी घेतात, ते मराठा आरक्षणात अडचण यावे, अशी भूमिका कधीच घेणार नाहीत, याची खात्री मनोज जरांगेंनी बाळगावी, असे सामंत म्हणाले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com