Manoj Jarange: मराठा आरक्षणाचे आंदोलक मनोज जरांगे यांनी पुन्हा एकदा सरकारला आंदोलनाचा इशारा दिला आहे. मराठा आरक्षणाची लढाई जिंकल्यानंतरही जरांगेंनी अन्यायाची भावना व्यक्त केली आहे. त्यामुळं आपल्याला पुन्हा एकदा विखे आणि सरकारविरोधात आंदोलन करावं लागेल असं त्यांनी म्हटलं आहे.
मुंबईतल्या आझाद मैदानात निर्णायक आंदोलन केल्यानंतर मनोज जरांगेंनी आपला विजय झाल्याचं म्हटलं होतं. या आंदोलनावेळी सरकारनं जीआर काढत हैदराबाद गॅझेटियर लागू करण्यात येत असल्याची घोषणाही केली. पण तरीही ज्यांच्या नोंदी सापडल्यात त्यांना प्रमाणपत्रे वाटपात अडचणी येत आहेत. याचा उल्लेख करत जरांगे म्हणाले, "तुम्ही गॅझेटियरचा जीआर काढलाय, का बरं अधिकाऱ्यांकडून जाणून बुझून असं घडतंय. जर सरकारनं जीआर काढला असं सरकार म्हणतंय. मुख्यमंत्री फडणवीस देखील म्हणत आहेत की, आम्ही जीआर काढलाय. नेमकं सरकार मोठंय की अधिकारी! मी याबाबत शंभूराज देसाईंना भेटलो तर ते म्हणाले, आज कॅबिनेटला हा विषय घेतोय म्हणून. बघू आता यावर काय करतात नेमकं, कारण नाहीतर मग मला विखे पाटलांच्या आणि सरकारच्याविरोधात जावं लागणार आहे. माझा नाईलाज आहे. मी फक्त एक शंका व्यक्त केली, मला वाटतं नाही तशी आंदोलन करण्याची आता मराठ्यांना वेळ येणार नाही. त्यामुळं जर नोंदी सापडलेल्या असताना कुणबी प्रमाणपत्रांसाठी अर्ज गेलेत तर तुमच्याकडून प्रमाणपत्र का दिले जात नाहीत? की गोड बोलून तुम्ही फसवणूक करत आहात मराठ्यांची? असा सवालही जरांगे यांनी केला आहे.
दरम्यान, मराठवाड्यातील अनेक भागांमध्ये मराठा समाजातील लोकांना ज्यांच्या हैदराबाद गॅझेटियरनुसार कुणबी अशा नोंदी सापडल्या आहेत त्यांना कुणबी प्रमाणपत्रे दिली जात नाहीत. हा प्रकार जाणुनबुझून केला जात असल्याचा आरोप मनोज जरांगे यांनीच काही दिवसांपूर्वी केला होता. त्यावेळी त्यांनी म्हटलं होतं की, हा प्रकार मुख्यमंत्र्यांच्या कानापर्यंत गेला पाहिजे. राज्य शासनाच्या, मराठा आरक्षण विषय उपसमितीच्या कानावरही ही बाब गेली पाहिजे. गोरगरीब मराठ्याला जाणून बुझून वेठीस धरलं जात आहे. त्यांना नोंदी असून देखील कुणबी प्रमाणपत्र दिलं जात नाही. अर्ज केलेल्या बांधवांना प्रमाणपत्र जाणून बुझून दिले जात नाहीत.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.