

Manoj Jarange slams on Dhananjay Munde: मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे यांनी पुन्हा एकदा राष्ट्रवादीचे आमदार धनंजय मुंडे यांच्यावर घणाघाती आरोप केले आहेत. त्याचबरोबर नागपुरच्या एका महिलाचा उल्लेख करताना या महिलेला मुंडेंकडून त्रास दिला गेल्याचा खळबळजनक दावाही त्यांनी केला आहे. विशेष म्हणजे ही महिला मुख्यमंत्री फडणवीस यांच्या नात्यातील असून नागपूरची रहिवासी आहे, असंही जरांगेंनी म्हटलं आहे. तसंच "धन्या तु माझ्या नादी लागू नकोस, माझ्याकडं तुझी २२ प्रकरणं आहेत" अशा शब्दांत त्यांनी धनंजय मुंडे यांना थेट इशाराही दिला.
धनंजय मुंडे यांचे पुन्हा मंत्रीपद मिळवण्यासाठी प्रयत्न सुरु आहेत. यावर जरांगे म्हणाले, "रक्तानं हात भरलेल्या लोकांना भाजप का मंत्रीपद देईल. संतोष देशमुखांना अजून न्याय मिळालेला नाही. ज्याच्या कार्यकर्त्यानं देशमुखांचा खून केला अशा माणसाला भाजप मंत्रीपद देईल का? राष्ट्रवादी तर देणारच नाही. जर दिलं तर राष्ट्रवादी पक्ष संपून जाईल. घातपाताच्या सुपाऱ्या देऊन त्यानं आमचेच लोक पुन्हा उभे केले आहेत. आम्हाला कळत नाही काय? आम्ही पूर्ण माहिती घेत आहोत. आमच्या लोकांना घातपात करुन त्यांना उचकून देऊ नको. त्या धन्यानं माझ्या नादी लागू नये आणखीन तरी. तुझे एवढे मॅटर यायला लागले आहेत माझ्याकडं भयानक. मी आणखी हात घातला नाही. सावध होय तू तुझी लाभार्थी टोळी माझ्याविरोधात कशी लावली हे मला चांगलं माहितीए. तू माझेच लोक माझ्याच विरोधात उचकावयाला लागला आहेस"
"धन्याची लाभार्थी टोळी अंधारातून त्याला सपोर्ट करते हे आम्हाला माहिती आहे. तुझे इतके मॅटर आहेत की मी त्यात अजून हात घातलेला नाही. आज सकाळी रंजना प्रदीपराव नागपूरकर नावाची एक महिला सकाळी माझ्याकडं आली होती. हे इतकं भयानक मॅटर आहे. कारण शोभाताई फडणवीस यांच्या बहिणीची मुलगी त्यांच्या घरी दिलेली आहे. हे प्रकरण अजून फडणवीसांना देखील माहिती नसेल. किती प्रचंड मोठ्या प्रमाणावर फसवणूक फडणवीसांच्याच पाहुण्यांचीच झाली आहे. ही महिला माझ्या घरी येऊन रडत होती.
या महिलेच्या पतीचं निधनही झालं आहे, याच्या टेन्शनपायी. त्यामुळं धन्या, इथून पुढे तरी तु माझ्या नादी लागू नकोस कारण मी जर या प्रकरणात लक्ष घातलं ना तर तुझे लय हाल होतील. तू इथून पुढे तरी हे चाळे बंद कर. माझ्या नादी लागू नकोस लय बेक्कार होईल बरं का आणखीनं. मी फक्त त्याला संदेश दिला आहे याद्वारे. आमच्याच लोकांना तो घातपाताच्या सुपाऱ्या द्यायला लागला, ते गप्प बसले होते तरी तुझ्या टोळीनं त्यांना उचकायला लावलं आहे" अशा घणाघाती शब्दांत मनोज जरांगे यांनी धनंजय मुंडेंवर आरोप केले आहेत.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.