Manoj Jarange Patil Sarkarnama
महाराष्ट्र

Manoj Jarange: रायगडावरून जरांगेंची मोठी घोषणा: मराठा आरक्षणानंतर 'या' समाजासाठी आता लढा उभारणार

Maratha Reservation: मराठा समाजाचे मागासलेपणा सिद्ध करण्याची जबाबदारी राज्य सरकारची आहे.

Sachin Waghmare

Raigad News : मराठा समाजाला आरक्षण मिळवून दिल्यानंतर मनोज जरांगे पाटील यांनी रायगडावरून मोठी घोषणा केली आहे. येत्या काळात धनगर, मुस्लिम आरक्षणासाठी काम करणार असल्याचे सांगत त्यांनी रणशिंग फुंकले आहे. येत्या काळात धनगर, मुस्लिम समाजाला आरक्षण मिळवून देण्यासाठी लढा उभारणार असल्याची घोषणा त्यांनी यावेळी केली.

रायगड येथील छत्रपती शिवाजी महाराजांच्या समाधीस्थळाचे दर्शन घेण्यासाठी मनोज जरांगे पाटील रायगड येथे आले आहेत. मराठा आरक्षणाची (Maratha reservation) लढा जिंकल्यानंतर ते रायगडावर दर्शनासाठी आले आहेत.

त्यानंतर बुधवारी अंतरवाली सराटी येथील घरी प्रवेश करणार आहेत. मराठा आरक्षण मिळेपर्यंत गृहप्रवेश करणार नसल्याचे त्यांनी सांगितले होते. ते ऑगस्टपासून आंदोलनाच्या निमित्ताने घराबाहेर होते.

येत्या काळात सगेसोयऱ्यांना प्रमाणपत्र मिळाल्यावर महादिवाळी साजरी करणार आहे. आरक्षणाची लढाई लांबपल्ल्याची असून ती सर्वांना लढावी लागणार आहे. मराठा समाजाचे मागासलेपणा सिद्ध करण्याची जबाबदारी राज्य सरकारची आहे.

त्यामुळे राज्य सरकारला येत्या काळात सत्याच्या बाजूने उभे रहावे लागणार आहे. त्यासोबतच येत्या काळात धनगर, मुस्लिम आरक्षणासाठी काम करणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

ओबीसींच्या सग्यासोयर्‍यांना देखील फायदा होणार आहे. हा कायदा केवळ आमच्यासाठी आहे. पण आमची नियत साफ आहे. या अधिसूचनेमुळे ओबीसी, एनटीव्हीजेंना देखील फायदा होणार आहे. त्यामुळे ओबीसी नेत्यांनी मंत्री छगन भुजबळ यांच्या नादी लागू नये, असे आवाहन मनोज जरांगे यांनी केले आहे.

मनोज जरांगे हे रायगडला पोहोचले आहेत. त्यापूर्वी ते रात्री नगरमध्ये मुक्कामी होते. बुरुडगाव (ता. नगर) येथे त्यांनी मुक्काम केला. त्यावेळी त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. जरांगेंनी यावेळी ओबीसी नेते मंत्री छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांच्यावर टीका केली आहे.

SCROLL FOR NEXT