Amol Kolhe News : हुजरेगिरी करणारे लोकप्रतिनिधी नको..! खासदार कोल्हेंनी नेमके कोणाला डिवचले ?

Yuva Sampark Abhiyan in Shevgaon, Pathardi Taluka : प्रतापराव ढाकणे यांनी शेवगाव, पाथर्डी तालुक्यात सुरु केलेल्या युवासंपर्क अभियानाचा समारोप.
Dr. Amol Kolhe
Dr. Amol KolheSarkarnama
Published on
Updated on

Amol Kolhe News : राष्ट्रवादी काॅंग्रेसचे खासदार डाॅ. अमोल कोल्हे यांनी भाजपला पुन्हा डिवचले आहे. खासदार कोल्हे यांनी नगर जिल्ह्यातून डिवचल्याने त्यांचे लक्ष्य भाजप खासदार सुजय विखे तर नव्हते ना, अशी चर्चा आहे. दिल्लीच्या इशाऱ्यावर हुजरेगिरी करणारा लोकप्रतिनिधी नको, असे त्यांनी म्हटले आहे. (Amol Kolhe criticism of BJP)

सर्वसामान्यांसाठी वाघासारखा लढणारा लोकप्रतिनिधी हवा आहे. असा लोकप्रतिनिधी लोकांनीच निवडून दिला पाहिजे. तसेच पाथर्डी - शेवगावमधील लोकांच्या मनात प्रतापराव ढाकणे हे आमदार व्हावे, अशी इच्छा आहे. तर ती यावेळी पूर्ण होणार आहे. सध्या झेंड्यांची भाषा वापरली जात आहे. पोटातल्या भुकेला जात आणि धर्म नसतो हे त्यांना कळेनासे झाले आहे, असे खासदार अमोल कोल्हे यांनी म्हटले आहे.

Dr. Amol Kolhe
Manoj Jarange: ओबीसींचे २७ टक्के आरक्षण रद्द करणार; जरांगेंच्या विधानाने खळबळ

राष्ट्रवादीचे प्रदेश सरचिटणीस प्रतापराव ढाकणे यांनी शेवगाव आणि पाथर्डी तालुक्यात सुरु केलेल्या युवासंपर्क अभियानाच्या समारोपावेळी ते बोलत होते. माधवराव निऱ्हाळी नाट्यगृहात आयोजित केलेल्या या कार्यक्रमाला ऋषिकेश ढाकणे, प्रभावती ढाकणे, शिवशंकर राजळे, भगवान दराडे, बंडू पाटील बोरुडे, सीताराम बोरुडे, महारुद्र किर्तने, माउली केळगंद्रे, डॉ. राजेंद्र खेडकर, आरती निऱ्हाळी उपस्थित होते.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

यावेळी 'विद्यार्थ्यांची वाटचाल भविष्याची' या पुस्तकाचे प्रकाशन खासदार कोल्हे यांच्या हस्ते करण्यात आले. खासदार कोल्हे म्हणाले, शेतीमालाला भाव नसल्याने शेतकरी कर्जबाजारी झाला आहे. शेतकऱ्यांच्या प्रश्नावर संसदेत चर्चा करा, अशी मागणी आम्ही केली. तर सुप्रिया सुळे व माझ्यावर निलंबनाची कारवाई केली. अंधभक्तांच्या टोळीपासून आता आपल्याला वाचवायचे असल्याने नवमतदारांनी विचारपूर्वक मतदान करायला हवे.

वंचितांसाठी आपले आयुष्य वेचण्याचे काम लोकनेते गोपीनाथ मुंडे यांनी केल्याने पाथर्डी तालुक्यात आल्यानंतर त्यांची आठवण आल्याशिवाय राहात नाही. बबनराव ढाकणे यांनी तालुक्यात वीज आणण्यासाठी विधानसभेत पत्रके फेकली अन् काळाच्या ओघात ते देशाचे ऊर्जामंत्री झाले, हा प्रवास प्रेरणादायी आहे. आपली अर्थव्यवस्था ही पाचव्या स्थानावर असल्याचे सांगितले जाते.

मात्र देशातील 90 टक्के संपत्ती ही 10 टक्के लोकांच्या हातात आहे. टाटा एअरबस,वेदांत सारखे राज्याच्या ताटातील प्रकल्प गुजरातला नेण्यात आले मात्र या विषयावर सत्ताधारी खासदार बोलत नाही. कोट्यवधी रुपयांचे रस्ते, पूल, राममंदिर उभारले याचा आम्हालाही अभिमान आहे. मात्र माणूस सुद्धा जगला पाहिजे, याचा विचार सरकार करत नाही, असेही खासदार कोल्हे यांनी म्हटले.

83 वर्षाच्या शरद पवारांचा संघर्ष जिंकणार...

जाती धर्माच्या नावाखाली जनतेला वेढण्याचे काम यांनी सुरु केले आहे. विरोधात कोणी बोलले तर ईडी व सीडीचा वापर केला जातोय. मात्र, या सर्वांविरुद्ध 83 वर्षाचे तरुण नेते शरद पवार लढत आहेत. जो संघर्ष करतो आणि संघर्षात लढतो त्याचा इतिहास साक्षीदार राहतो.

जिंकलेला व हरलेला यामध्ये एकच फरक असतो, तो म्हणजे जिंकलेल्या व्यक्तीने हरलेल्या व्यक्ती पेक्षा एकदा जास्त प्रयत्न केलेला असतो. त्यामुळे तो जिंकून विजयापर्यंत पोहोचतो. त्यामुळे तरुणांनी प्रयत्न करणे सोडू नका विजय तुमचाच आहे, असा सल्ला देखील खासदार कोल्हे यांनी दिला.

(Edited by Amol Sutar)

Dr. Amol Kolhe
Ravindra Dhangekar : आमदार रवींद्र धंगेकर यांच्याविरोधात गुन्हा; अधिकाऱ्याला शिवीगाळ करणे भोवले

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com