Milind Shenoy Transfer Row: Minority Certificates Distributed: Sarkarnama
महाराष्ट्र

Sunetra Pawar News: सुनेत्रा पवारांकडून गंभीर दखल; अल्पसंख्यांक उपसचिवाला दणका, काय म्हटले आहे आदेशात?

Milind Shenoy Transfer Row: Minority Certificates Distributed: शेणॉय यांच्या चौकशीनंतर आथा त्यांची अल्पसंख्यांक विभागातून हकालपट्टी करण्यात आली आहे. त्यांची बदली करण्यात आली असली, तरी पुढील पदी नियुक्ती करण्यात आलेली नाही. "बदलीनंतर पुढील पदस्थापनेची त्यांनी प्रतिक्षा करावी, असे आदेशात स्पष्ट करण्यात आले आहे.

Mangesh Mahale

Milind Shenoy transfer News:अजित पवार यांच्या निधनाच्या दिवशी राज्यातील 75 शैक्षणिक संस्थांना अल्पसंख्यांक दर्जा देण्याचा निर्णय मंत्रालयात घेण्यात आला होता. या निर्णयामुळे राज्यात खळबळ उडाली होती. त्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या निर्णयाला स्थगिती दिली होती. तर उपमुख्ममंत्री सुनेत्रा पवार यांनी याबाबत उच्चस्तरीय चौकशी करण्याचे आदेश दिले होते.

ऑगस्ट २०२५ पासून राज्यातील शैक्षणिक संस्थांना अल्पसंख्यांक दर्जा देण्याची प्रक्रिया स्थगित केली गेली होती. तरीही 75 शाळांना अल्पसंख्यांक प्रमाणपत्र देण्यात आली आहे. या सर्व प्रमाणपत्रावर विभागाचे उपसचिव उपसचिव मिलिंद शेणॉय यांची सही होती.

शेणॉय यांच्या चौकशीनंतर आथा त्यांची अल्पसंख्यांक विभागातून हकालपट्टी करण्यात आली आहे. त्यांची बदली करण्यात आली असली, तरी पुढील पदी नियुक्ती करण्यात आलेली नाही. "बदलीनंतर पुढील पदस्थापनेची त्यांनी प्रतिक्षा करावी, असे आदेशात स्पष्ट करण्यात आले आहे.

बारामतीजवळ २८ जानेवारी २०२६ रोजी अजितदादांचा विमान अपघातात मृत्यू झाला. त्यांचे पार्थिव रुग्णालयात ठेवलेले असतानाच मंत्रालयातून शैक्षणिक संस्थांना अल्पसंख्यांक दर्जा प्रमाणपत्र वाटप करण्यात येत असल्याचे उघडकीस आले आहे. शाळेला अल्पसंख्यांक प्रमाणपत्र देणाऱ्या अधिकाऱ्यांनी एका-एका प्रमाणपत्रासाठी २५ लाख रुपये घेतले असल्याचा आरोप करण्यात येत आहे.

काय म्हटले आहे आदेशात

'महाराष्ट्र शासकीय कर्मचाऱ्यांच्या बदल्यांचे विनियमन आणि शासकीय कर्तव्ये पार पाडताना होणाऱ्या विलंबास प्रतिबंध अधिनियम २००५' मधील कलम ४ (४) आणि ४(५) नुसार मिलिंद शेणॉय यांची बदली करण्यात आली आहे. प्रशासकीय कारणास्तव शेणॉय यांची बदली करण्यात आल्याचेही आदेशात म्हटले आहे.

अल्पसंख्याक समाजासाठी असलेला निधी प्रत्येक घटकाला समप्रमाणात आणि पारदर्शकपणे वितरित व्हावा, तसेच विभागाचे कामकाज अधिक लोकाभिमुख व समाजाप्रती उत्तरदायी राहण्याच्या दृष्टीने प्रयत्न करण्याच्या सूचना उपमुख्यमंत्री तथा अल्पसंख्याक विकास मंत्री सुनेत्रा पवार यांनी दिल्या होत्या. शाळांना चुकीच्या पद्धतीने अल्पसंख्याक दर्जाचे प्रमाणपत्र वितरित करण्यात आलेल्या प्रकरणांची सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्याचे आदेश त्यांनी दिले आहेत.

कोण आहेत मिलिंद शेणॉय?

मिलिंद शेणॉय अल्पसंख्याक विभागाचे उपसचिव होते. राज्याच्या अर्थसंकल्पीय शिफारशींबाबत झालेल्या शिष्टमंडळासोबतच्या बैठकींमध्ये देखील मिलिंद शेणॉय सहभागी असायचे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT