

kolhapur News: महाविकास आघाडीच्या काळात राज्यपाल नियुक्त 12 आमदारांच्या नियुक्ती संदर्भातील वाद कोर्टात घेऊन गेल्यानंतर कोल्हापूर ठाकरे सेनेचे शहराध्यक्ष सुनील मोदी हे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या अगदी निकटवर्तीय बनले. मात्र कोल्हापूर महानगरपालिकेत दारुण पराभव झाल्यानंतर सुनील मोदी यांनी शहराध्यक्ष पदाचा राजीनामा दिला.
ठाकरे सेना आणि काँग्रेस यांनी कोल्हापूर महापालिका एकत्र निवडणूक लढवली असली तरी स्वीकृत नगरसेवक पदावर काँग्रेसकडून सुनील मोदी यांना संधी मिळाली आहे. मात्र याच संधीमुळे सुनील मोदी यांची ठाकरे सेनेतील प्रवास संपुष्टात येण्याची शक्यता आहे. याबाबतचे संकेत संपर्कप्रमुख अरुण दूधवडकर यांनी सरकारनामाशी बोलताना दिले आहेत.
कोल्हापूर महापालिकेत काँग्रेस 34 जागा मिळवत सर्वात नंबर वन पक्ष बनला. मात्र त्यांच्यासोबत असलेला ठाकरे सेनेच्या पक्षाने केवळ एका जागेवर विजय मिळवला. निवडणुकीत मिळालेल्या अपयशामुळे अंतर्गत गटबाजीचे कारण देत शहराध्यक्ष सुनील मोदी यांनी ठाकरे सेनेच्या शहराध्यक्ष पदाचा राजीनामा दिला. मात्र जागा वाटपाच्या निर्णयावेळीच काँग्रेस नेते आमदार सतेज पाटील यांच्याकडून स्वीकृत नगरसेवक पदाचा शब्द सुनील मोदी यांनी घेतल्याचे सांगितले जाते.
काँग्रेस नेते आमदार सतेज पाटील यांनी काँग्रेसकडून सुनील मोदी यांना संधी देण्याचे निश्चित केले आहे. महापालिका निवडणुकीत निकालानंतर राजीनामा दिलेले शहराध्यक्ष सुनील मोदी यांचा अद्याप पक्षप्रमुखांनी राजीनामा मंजूर केलेला नाही. ते अजूनही पक्षात सक्रिय असल्याचे वरिष्ठ स्तरावरून सांगण्यात येते.
संपर्कप्रमुख अरुण दुधवडकर यांच्याशी संपर्क साधला असताना,सुनील मोदी यांचा राजीनामा अद्याप मंजूर केलेला नाही. काँग्रेस आणि ठाकरेंच्या शिवसेनेने एकत्र निवडणूक लढवली आहे. तर काँग्रेसच्या कोट्यातून ठाकरे सेनेला एक जागा देत असतील तर त्या निर्णयाचं आम्ही स्वागत करू. अन्यथा, सुनील मोदी यांचा ठाकरेंच्या सेनेतून हिसाब किताब केला जाईल असे स्पष्टीकरण थेट दुधवडकर यांनी सरकारनामाशी बोलताना दिले आहेत.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.