Vinod tawde Sarkarnama
महाराष्ट्र

Vinod Tawde News : विनोद तावडेंचा महाविकास आघाडी सरकारच्या कारभारावर गंभीर आरोप, म्हणाले...

Political News : महाविकास आघाडी सरकारच्या काळात राज्यातील अनेक प्रकल्प अडवले गेले. त्यामुळे राज्याचा विकास खुंटला होता, असा आरोप भाजपचे महासचिव विनोद तावडे यांनी केला आहे.

Sachin Waghmare

Political News : राज्यातील महायुतीच्या सरकारचे काम चांगल्या पद्धतीने सुरू आहे. त्यामुळे अनेक विकासकामे व प्रकल्प मार्गी लागले आहेत. त्यामुळे येत्या काळात राज्यात आम्ही चांगल्या जागा मिळवू याची खात्री आहे. महाविकास आघाडी सरकारच्या काळात राज्यातील अनेक प्रकल्प अडवले गेले. त्यामुळे राज्याचा विकास खुंटला होता, असा आरोप भाजपचे महासचिव विनोद तावडे यांनी केला आहे.

मुंबईत भाजपचे (Bjp) महासचिव विनोद तावडे (Vinod Tawde) यांनी पत्रकार परिषद घेत महाविकास आघाडी सरकारच्या काळात झालेल्या कामावर गंभीर आरोप केले आहेत. (Vinod Tawde News)

राज्यात महाविकास आघाडीचे सरकार सत्तेत असताना अनेक लोकहिताचे प्रकल्प राजकीय सूडबुद्धीतून बंद करण्यात आले होते. त्या सरकारमध्ये सगळे अहंकाराने भरले होते, सर्वांना प्रचंड इगो होता. मात्र, शिवसेना भाजप युतीचे सरकार गेल्या वर्षी सत्तेत आल्यानंतर आम्ही या बंद करण्यात आलेल्या लोकहिताच्या प्रकल्पांना चालना दिली आहे, कामे मार्गी लागत असल्याने जनतेतून समाधान व्यक्त केले जात आहे.

महाविकास आघाडीचे सरकारच्या काळात पूर्वीच्या भाजप सरकारकडून सुरू करण्यात आलेले जलसंवर्धनाचे कामे, वॉटर ग्रीड योजना, मेट्रो कार शेड अशा अनेक कामांना खोडा घालण्यात आला. त्यामुळे राज्याचा विकास खुंटला होता. त्यानंतर महायुतीचे सरकार आल्यानंतर या रखडलेल्या कामांना वेग देण्याचे काम राज्य सरकारने केले असल्याचे तावडे यांनी सांगितले.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

त्यामुळे महायुतीच्या सरकारविषयी जनभावना चांगली आहे. त्याचा परिणाम आगामी काळात होत असलेल्या लोकसभा निवडणुकीत पाहावयास मिळणार आहे. त्यामुळे येत्या काळात राज्यात आम्ही चांगल्या जागा मिळवू याची खात्री असल्याचा पुनरुच्चार तावडे यांनी या वेळी बोलताना केला.

R

SCROLL FOR NEXT