Atiq Ahmad : अतिक अहमदला भारतरत्न द्या म्हणणाऱ्या काँग्रेस नेत्याची पक्षातून हकालपट्टी; वादग्रस्त विधान भोवलं!

Congress News : काँग्रेसने या नेत्याची पक्षातून 6 वर्षांसाठी हकालपट्टी केली.
Congress
Congress Sarkarnama

Uttar Pradesh : उत्तर प्रदेशमधील प्रयागराजमध्ये गँगस्टर अतिक अहमद आणि त्याचा भाऊ अशरफचा हल्लेखोरांनी गोळ्या झाडून खून केला. पोलिसांच्या समोरच हा हल्ला झाला. या घटनेमुळे उत्तर प्रदेशच नाही तर देशात खळबळ उडाली.

आता अतिक अहमद आणि अशरफबाबत एका काँग्रेस नेत्याचे वादग्रस्त वक्तव्य सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये ते अतिक अहमदला भारतरत्न देण्याची मागणी करत आहेत. राजकुमार सिंग असं या नेत्याचं नाव असून त्यांच्या या वक्तव्यामुळे खळबळ उडाली आहे.

Congress
Karnataka Election : भाजपच्या तावडे-शेलारांकडे आयटी हब असलेल्या बंगळुरूची जबाबदारी; 'हे' आहे कारण

राजकुमार सिंग उर्फ ​​रज्जू भैया हे काँग्रेस पक्षाचे जुने नेते असल्याचे सांगण्यात येत आहे. तर त्यांच्या या वक्तव्यामुळे काँग्रेसने त्यांची पक्षातून सहा वर्षांसाठी हकालपट्टी केली आहे.

तसेच राजकुमार सिंग यांच ते वक्तव्य वैयक्तिक असून पक्षाचा त्याच्याशी काहीही संबंध नाही, असं स्पष्टीकरण काँग्रेसकडून देण्यात आलं आहे. तर राजकुमार सिंग यांच्यावर शिस्तभंगाची कारवाई करत पक्षाने त्यांना महापालिका निवडणुकीसाठी दिलेली उमेदवारी मागे घेतली आहे.

Congress
Pimpri-Chinchwad : 'स्वाईन फ्लू' नंतर आता कोरोनानेही घेतला पिंपरीत एक बळी; प्रशासन अलर्ट

दरम्यान, राजकुमार सिंग हे काँग्रेस पक्षाचे जुने नेते आहेत. यापूर्वी राजकुमार सिंग यांनी नगरसेवकपदाची निवडणूकही लढवली आहे. तर व्हायरल झालेल्या व्हिडिओच्या आधारे पोलिसांनी काँग्रेसच्या या नेत्याला ताब्यात घेतलं आहे.

मुलायमसिंह यादव यांना जर पद्मविभूषण मिळू शकतो, तर अतिक अहमदला भारतरत्न का मिळू नये? असा सवाल त्यांनी उपस्थित केला होता. मात्र, आता त्यांनी केलेलं हे विधान त्यांना भोवलं आहे.

(Edited By Ganesh Thombare)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com