Maratha Reservation  Sarkarnama
महाराष्ट्र

Maratha Reservation : भुजबळांनी जरांगेंना डिवचले, ‘तुमची 12 इंचाची छाती आहे, तब्येत सांभाळा’

Obc Reservation : येवल्याचे येडपट हा शब्द मंत्री छगन भुजबळ यांच्या जिव्हारी लागला, जरांगे पाटील यांनी लोकशाहीमार्गाने लढा देण्याचा सल्ला

संपत देवगिरे - सरकारनामा ब्युरो

Bhujbal Vs Jarange Patil : मराठा आरक्षण लढ्याचे नेते मनोज जरांगे पाटील यांच्या बीड येथील सभेला मोठा प्रतिसाद मिळाला. या सभेमुळे त्यांच्या राजकीय विरोधकांना देखील चांगलीच धडकी भरली आहे. तर दुसरीकडे या सभेमुळे राज्य सरकार देखील सावध झाले आहे.

बीड येथील जाहीर सभेत जरांगे-पाटील छगन भुजबळ यांचा नामोल्लेख टाळत, ‘येवल्याचे येडपट’ असे संबोधले होते. हा उल्लेख मंत्री भुजबळ यांना चांगलाच झोबल्याचे दिसले. त्यांनी त्याला प्रत्युत्तर दिले आहे. ते म्हणाले, जरांगे काहीही मागण्या करत असेल तर मला बोलावे लागेल. मी कोणत्याही धमक्यांना दाद देत नाही, टोमण्यांनी फरक पडत नाही. जरांगे पाटील यांची छाती 12 इंचाची आहे. त्यांनी आधी आपली तब्येत सांभाळावी, असा सल्ला त्यांनी दिला.

यासंदर्भात भुजबळ यांनी जरांगे यांच्या टीकेला आपल्या शैलीतून उत्तर दिले. ते म्हणाले, की जरांगे यांचे अर्धे भाषण केवळ माझ्यावरच होते. त्यानंतरचं भाषण लेकरे वगैरे वगैरेवर होते. भुजबळांवर बोलले नाही, टीका केली नाही तर ते आपल्या भाषणात बोलणार काय ?, असा सवाल त्यांनी उपस्थित केला.

ते म्हणाले, मी कालच म्हटले व्याह्यांना आरक्षण द्या. व्याह्यांच्या व्याह्यांना आरक्षण द्या. पण तो मुद्दा त्यांनी भाषणात घेतला नाही. काय झाले माहिती नाही. त्यांच्या स्मरणशक्तीत गडबड आहे. एकाच भाषणात दुहेरी बोलत असल्याचे सांगत भुजबळांनी जरांगे यांच्यावर टीकास्त्र सोडले. जरांगे भाषणात येडपट वगेरे बोलतात, एवढ्या मोठ्या मोठ्या गर्जना करतात. आपली १२ इंचाची छाती आहे. तब्येत सांभाळायला हवी, असे सांगून भुजबळ यांनी जरांगे पाटील यांच्यावर आपला संताप व्यक्त केला.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

छगन भुजबळ (Chagan Bhujbal) म्हणाले, हॉटेल भुजबळ किंवा त्यांच्या माणसांनी जाळले, असे सुरवातीला मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange) म्हणाले. त्यावर, म्हणे मराठ्यांना डाग लावला. आधी म्हणाले सरकारी अधिकाऱ्यांनी घरे आणि हॉटेल जाळले. आता भुजबळांचे नाव घेत आहेत.

जरांगे यांनी ध्यानधारणा करावी

जरांगे यांनी थोडे आलोम-विलोम, प्राणायाम, ध्यानधारणा करावी. त्यांच्या भाषणात विसंगती येणार नाही, असा चिमटा भुजबळांनी या वेळी लगावला. या वेळी प्रदेश चिटणीस दिलीप खैरे, समाधान जेजुरकर आदी उपस्थित होते.

(Edited by Sachin Waghmare)

SCROLL FOR NEXT