Hingoli Loksabha Constituency : हिंगोली मतदारसंघात शिवसैनिकच एकमेकांना भिडणार...

Maharashtra News : शिवसेना आणि राष्ट्रवादी कॉंग्रेस मध्ये फुट पडल्यानंतर हिंगोली जिल्ह्यात त्याचे पडसाद उमटले.
Hingoli Loksabha Constituency
Hingoli Loksabha ConstituencySarkarnama
Published on
Updated on

Marathwada Shivsena News : राज्यातील शिवसेनेत फूट पडल्यानंतर आगामी लोकसभा निवडणुकीत अनेक लोकसभा मतदारसंघात शिवसेना विरुद्ध शिवसेना असा सामना पाहायला मिळणार आहे. (Hingoli Loksabha Constituency) बाळासाहबे ठाकरे यांचे नाव घेऊन दोन्ही बाजूने शिवसैनिकच एकमेकांना भिडणार असल्याने या युद्धात कोण जिंकणार? याची चर्चा आतापासूनच सुरू झाली आहे.

Hingoli Loksabha Constituency
Shivsena Convention : शिवसेना नाशिकमधून फुंकणार लोकसभेचे रणशिंग; 28 वर्षांपूर्वीची पुनरावृत्ती होणार

राजकीय आखाड्यात प्रतिस्पर्ध्याला अस्मान दाखवण्यासाठी वेगवेगळे डावपेच लढवले जातात. मात्र एकेकाळचा सहकारी जेव्हा प्रतिस्पर्धी बनून मैदानात उतरतो आणि पराभूत झाल्यानंतर पुन्हा नव्याने दंड थोपटून मैदानात उतरतो तेव्हा ते दोघांसाठी आव्हानात्मक असते. (Hingoli) हिंगोली लोकसभा निवडणुकीत अशाच प्रकारचा सामना पुन्हा एकदा रंगण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

राज्यातील राजकारणाच्या आखाड्यात हिंगोली लोकसभा मतदारसंघ कायम चर्चेत असतो. शिवसेना (Shivsena) आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फुट पडल्यानंतर हिंगोली जिल्ह्यात त्याचे पडसाद उमटले. विद्यमान खासदार शिवसेनेचे हेमंत पाटील (Hemant Patil) यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत राहण्याचा निर्णय घेतला. तर कळमनुरी विधानसभा मतदारसंघाचे आमदार संतोष बांगर हे अगोदर पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांच्याशी एकनिष्ठ राहिले मात्र घुमजाव करत अचानक एकनाथ शिंदे यांच्यासोबत जाण्याचा निर्णय घेतला.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

वसमतचे आमदार राष्ट्रवादी काँग्रेसचे राजू उर्फ चंद्रकांत नवघरे हे शरद पवार गटात असल्याचे सांगत असले तरी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याशी असलेले त्यांचे सख्य सर्वश्रुत आहे. हिंगोलीचे माजी खासदार काँग्रेसचे सुभाष वानखेडे यांनी पुन्हा स्वगृही परतण्याचा निर्णय घेत उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत शिवबंधन बांधले. शिवसेनेतून राजकीय कारकीर्द सुरु केलेल्या सुभाष वानखेडे यांनी नांदेड जिल्ह्यातील हदगाव विधानसभा मतदारसंघातून विजय मिळवला होता.

तसेच 2009 मध्ये झालेल्या लोकसभा निवडणुकीत हिंगोली मतदारसंघातून त्यांनी सुर्यकांता पाटील यांचा पराभव केला होता. 2014 मध्ये काँग्रेसचे स्व. राजीव सातव यांनी त्यांचा पराभव केला होता. पराभवानंतर त्यांनी शिवसेनेला जय महाराष्ट्र करत भाजपमध्ये प्रवेश केला. 2019 मध्ये काँग्रेसमध्ये प्रवेश करत त्यांनी हिंगोली लोकसभेची उमेदवारी मिळवली. मात्र शिवसेनेतील एकेकाळचे सहकारी व विद्यमान खासदार हेमंत पाटील यांनी त्यांचा पराभव केला.

Hingoli Loksabha Constituency
Hemant Patil: खासदार हेमंत पाटलांना लंडनहून धमकी; पन्नू म्हणाला,'भारतात मोठा स्फोट करणार...'

अखेर राज्यातील बदलत्या घडामोडीनंतर त्यांनी उद्धव ठाकरे यांची भेट घेत स्वगृही जाण्याचा निर्णय घेतला. शिवसेना ते शिवसेना असा त्यांचा राजकीय प्रवास पूर्ण झाला आहे. शिवसेनेत फुट पडल्यानंतर ज्या खासदारांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना साथ देण्याचे ठरवले त्या सर्व ठिकाणी शिवसेनेचेच (शिंदे गट) उमेदवार असतील असे सांगण्यात आले आहे.

त्यामुळे महायुतीच्या जागावाटपात हिंगोली लोकसभा मतदारसंघ शिवसेना शिंदे गटाकडे असण्याची शक्यता आहे. तर महाविकास आघाडीच्या जागावाटपात हिंगोली लोकसभा मतदारसंघ शिवसेना (उबाठा) पक्षाकडे गेल्यास सुभाष वानखेडे हे प्रबळ दावेदार मानले जात आहेत. असे झाले तर एकेकाळचे सहकारी असलेले दोन शिवसैनिक पुन्हा एकदा आमनेसामने येतील.

Edited By : Jagdish Pansare

Hingoli Loksabha Constituency
सिंधुदुर्गात भाजप आणि ठाकरे गटाचे कार्यकर्ते भिडले | BJP vs Shivsena UBT | Sindhudurg News

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com