Chhagan Bhujbal Sarkarnama
महाराष्ट्र

Video Chhagan Bhujbal : मराठा आरक्षणाबाबत छगन भुजबळांचा मोठा आरोप, 'बारामतीमधून फोन गेला आणि...'

Chhagan Bhujbal On maratha Reservation Sharad pawar : आरक्षणाचे भांडण मिटावे म्हणून सरकारने बैठक बोलावली. विरोधी पक्षनेत्यांनी येणे क्रमप्राप्त होते. शरद पवार साहेबांना पण बोलावून घ्या, असे मी सांगितले, असे छगन भुजबळ म्हणाले.

Roshan More

Chhagan Bhujbal News : राष्ट्रवादी काँग्रेसची (अजित पवार गट) 'जनसन्मान' रॅली बारामतीमध्ये झाली. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या रॅलीमध्ये मंत्री छगन भुजबळ यांनी जोरदार फटकेबाजी केली. 'मराठा आरक्षणासाठी बैठक बोलावली होती. बैठकीला विरोधी पक्षनेते येण्यास तयार होते. मात्र, संध्याकाळी बारामतीवरून फोन गेला आणि विरोधी पक्षाने बैठकीवर बहिष्कार टाकला', असा गौप्यस्फोट छगन भुजबळ यांनी केला.

आरक्षणाचा प्रश्न राज्यभर गाजतोय. मराठा आरक्षणाला आमचा विरोध नाही. ज्यांना आरक्षण मिळाले आहे. त्यांच्यावर अन्याय होणार नाही याची काळजी घ्या, असे आवाहन छगन भुजबळ यांनी केले.

छगन भुजबळ Chhagan Bhujbal म्हणाले, आरक्षणाचे भांडण मिटावे म्हणून सरकारने बैठक बोलावली. विरोधी पक्षनेत्यांनी येणे क्रमप्राप्त होते. मी विजय वडेट्टीवार, जितेंद्र आव्हाड यांच्याशी बोललो. शरद पवार साहेबांना पण बोलावून घ्या, असे म्हणालो. पवार साहेबांनी आरक्षणाच्या बाबातीत काही प्रश्न निर्माण होतात त्यावेळी महाराष्ट्राचे ज्येष्ठ नेते म्हणून येणे अपेक्षित होते. मात्र, बारामतीवरून फोन आला आणि विरोधी पक्षाने बैठकीवर बहिष्कार टाकला.

शरद पवारांचे Sharad pawar नाव न घेता छगन भुजबळांनी पवारांव टीका केली. 'संरक्षण करणे हे तुमचे काम नाही? तुमचा राग आमच्यावर असेल ओबीसी समाजाने तुमचे काय घोडे मारले. तुम्ही का येत नाही. तुम्ही आमच्या बरोबर येत नाही. पाठीमागून सल्ले द्यायचे. त्यातून महाराष्ट्र पेटवण्याचे प्रयत्न करायचे.', असे भुजबळ म्हणाले.

सामाजिक प्रश्न सोडवा

निवडणूक तुम्ही तुमच्या मुद्द्यावर लढवा. आम्ही आमच्या मुद्यावर लढू. मात्र, सामाजिक प्रश्न सोडवताना एकत्र येऊन सोडवण्याचा प्रयत्न करू, असे आवाहन विरोधी पक्षांना छगन भुजबळ यांनी केली. तर, विधानसभा निवडणुकीत महायुतीला निवडून द्यायचं आहे. तर, 'लाडकी बहीण योजना' पुढे चालणार आहे. हौशे, नवशे, गवशे येतील, काही सांगण्याचा प्रयत्न करतील, विश्वास ठेवून नका. हा अजितदादा शब्दांचा पक्का आहे. त्यात कुठेही बदलणार नाही," असे अजित पवार यांनी म्हटले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT