Hiraman khoskar : आमदार खोसकर म्हणाले, "माझ्यासारख्या गरीबाचा बळी देऊ नका"

Congress MLA Hiraman khoskar On Legislative Council Election : विधान परिषद निवडणुकीत काँग्रेस आमदारांची मते फुटली. हा विषय वरिष्ठ नेत्यांनी गांभीर्याने घेतला आहे. याबाबत फुटीर आमदार कोण हा वाद पेटण्याची चिन्हे आहेत.
Hiraman Khoskar
Hiraman KhoskarSarkarnama
Published on
Updated on

Congress News : विधान परिषद निवडणुकीत काँग्रेस आमदारांची मते फुटली. हा विषय वरिष्ठ नेत्यांनी गांभीर्याने घेतला आहे. याबाबत फुटीर आमदार कोण हा वाद पेटण्याची चिन्हे आहेत. विधान परिषद निवडणुकीत काँग्रेसची मते फुटली. त्यामुळे पक्षाला नामुष्की पत्करावी लागली आहे.

प्रदेशाध्यक्ष आणि नेत्यांचे आमदारांवर नियंत्रण नाही, असाही एक संदेश गेला आहे. तर आता या फुटीर आमदारांचा शोध ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात घेत आहेत. याबाबत मतदान प्रक्रिया तपासली जाणार आहे. यातून काही आमदारांची नावे चर्चेत आहेत. यामध्ये पक्षादेश झुगारणाऱ्या आमदारावर कारवाईचे संकेत पक्षाने दिले आहेत.

त्यामुळे आता हा वाद चांगलाच पेटण्याची चिन्हे आहेत. या संदर्भात गेल्या दोन दिवसांपासून इगतपुरीचे आमदार हिरामण खोसकर यांचे नाव चर्चेत आहे. त्यामुळे संतप्त झालेल्या आमदार खोसकर यांनी याबाबत स्वतःच पुढे येऊन खुलासा केला आहे.

या संदर्भात बोलताना आमदार खोसकर म्हणाले, मी निवडणुकीत पक्षाच्या आदेशाप्रमाणेच मतदान केले आहे. आम्ही सात आमदार कैलास गोरंट्याल आणि प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांच्या समवेत मतदानाला गेलो होतो. तेथून मतदान करून एकत्रच बाहेर पडलो आहे.

Hiraman Khoskar
Video Ajit Pawar : हौसे, नवसे, गवसे येतील, विश्वास ठेवू नका; बारामतीतून अजित पवारांचा रोख कुणाकडे?

पक्षाचे अध्यक्षाप्रमाणे मी पहिल्या पसंतीची सात मते शिवसेनेचे (Shivsena) उमेदवार मिलिंद नार्वेकर यांना दिली आहेत. दुसऱ्या पसंतीची मते जयंत पाटील यांना आणि तिसऱ्या पसंतीची प्रज्ञा सातव यांना दिली. त्यात कुठेही गोंधळ झालेला नाही. आमदार खोसकर म्हणाले, "काही नेते जाणीवपूर्वक माझे नाव अडकवण्याचा प्रयत्न करत आहेत. जे आमदार फुटले आहेत त्यांची नावे समोर येत नाहीत. फक्त माझेच नाव जाणीवपूर्वक पुढे केले जात आहे.

हे संतापजनक असून मला फसवले जात आहे. मी पक्षाचा आदेश झुगारलेला नाही. पक्षाने सांगितल्याप्रमाणेच मतदान केले आहे. काही वरिष्ठ नेते मात्र बडी नावे लपवून माझ्यासारख्या गरीब आमदाराला अडचणीत आणण्याचा प्रयत्न करीत आहेत. याबाबत मला न्याय अपेक्षित आहे. हवे तर पक्षाने न्यायालयाकडून आदेश आणून प्रत्येक आमदाराने केलेले मतदान तपासून पहावे त्यातून सत्य बाहेर येईल."

Hiraman Khoskar
Shivsena News : शिवसेना चिन्ह, पक्षाबाबत ठाकरे गटाने कोर्टात दाखल केलेल्या याचिकेवरील सुनावणी पुन्हा लांबणीवर

आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर विधान परिषद निवडणुकीतील फुटीर आमदारांचे मतदान काही आमदारांना चांगलेच भोवण्याची चिन्हे आहेत. त्याची जाणीव आता होऊ लागली आहे. या आमदारांवर कारवाई झाल्यास मतदानाचा आदेश झुगारून या आमदारांनी पायावर धोंडा पाडून घेतला आहे, असे स्पष्ट जाणवू लागले आहे. तर यातील काही आमदारांनी आता वरिष्ठांच्या आदेशावरच प्रश्नचिन्ह निर्माण करण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे हे प्रकरण आणखी काही दिवस धगधगत राहण्याचे चिन्ह आहेत.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com