Devendra Fadnavis, Manoj Jarange Sarkarnama
महाराष्ट्र

Devendra Fadnavis : 'संविधानाच्या बाहेर जाऊन निर्णय घेणार नाही', मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्पष्टच बोलले

Maratha Reservation Devendra Fadnavis : मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण देण्याच्या मागणीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपली भूमिका मांडली आहे. मागणीकडे आपण सकारात्मक पाहतो, असे देखील त्यांनी सांगितले.

Roshan More

Maratha Reservation News : मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण द्या, या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील आक्रमक आहेत. त्यांचे उपोषण देखील सुरू आहे. दरम्यान, त्यांच्या मागणी संदर्भात एका वृत्तवाहिनीशी बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले,' भारतरत्न डाॅ. बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाने सांगितले आहे त्याच्या बाहेर जाऊ शकत नाही. जाणार नाही.'

पुढे बोलताना ते म्हणाले, मराठा आरक्षणाचा निर्णय कायद्याच्या चौकटीबाहेर जाऊन घ्या आणि अशांना केवळ खूश करण्यासाठी सरकार निर्णय घेतला तरी तो एक दिवसही टिकणार नाही.

मनोज जरांगे पाटील हे तुम्हाला शिव्या देतात, असा प्रश्न त्यांना विचारले असता ते म्हणाले, शिव्या खाणे, उपहास सहन करणे या सगळ्याची मला सवय आहे. त्याचा परिणम होत नाही कारण लोकं कतृत्वाचा इतिहास लक्षात ठेवतात, शिव्या देणाऱ्यांना लक्षात ठेवत नाही. आपलं कर्तत्व काय आहे हे महत्त्वाचं. शिव्या दिल्या तरी जे समाज हिताचे, बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाने सांगितले आहे त्याच्या बाहेर जाऊ शकत नाही.

'ओबीसीमध्ये समावेश करा यातून सोशल फॅब्रिकचा प्रश्न निर्माण होईल. कायद्याच्या चौकटीच्या बाहेर जाऊन असाच निर्णय करा, असे म्हटले जात आहे मात्र तो टिकणार नाही. ती मराठा समाजाची फसवणूक होईल.' , असे देखील त्यांनी सांगितले.. तसेच मनोज जरांगे पाटील यांच्या मागणीकडे आम्ही सकारात्मकतेनेच पाहतोय. ती कायद्याच्या चौकटीत बसली पाहिजे, असे म्हटले.

'वर्षा'वर बैठक, अ‍ॅडव्होकेट जनरलही उपस्थित

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मराठा आरक्षणाच्या प्रश्नावर रविवारी रात्री त्यांच्या वर्षा निवासस्थानी बैठक घेतली. या बैठकीला मराठा उपसमितीचे अध्यक्ष राधाकृष्ण विखे पाटील तसेच अॅडव्होकेट जनरल बिरेन सराफ उपस्थित होते. ओबीसीतून जी आरक्षणाची मागणी करण्यात येत आहे त्यावर कसा तोडगा काढायचा यावर तसेच कोर्टाने यापूर्वी दिलेल्या निर्णयावर चर्चा या बैठकीत चर्चा झाल्याचे सांगितले जात आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT