Maharashtra Assembly Session LIVE Updates Sarkarnama
महाराष्ट्र

Maratha Reservation LIVE Updates : सगेसोयरे अधिसूचनेचे काय होणार? जरांगेंच्या इशाऱ्यानंतर मुख्यमंत्र्यांनी दिली महत्त्वाची माहिती...

Rajanand More

CM Eknath Shinde Speech : मराठा आरक्षणाबाबत सगेसोयरे अधिसूचनेची तातडीने अंमलबजावणी करण्याची मागणी मनोज जरांगे पाटील यांनी केली आहे. सरकारने निर्णय न घेतल्यास आंदोलन सुरूच ठेवण्याचा इशारा जरांगे यांनी दिला आहे. यावर आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विधिमंडळात आपली भूमिका स्पष्ट केली आहे. या अधिसूचनेविषयी मुख्यमंत्र्यांनी सभागृहात महत्त्वाची माहिती दिली. (Maratha Reservation LIVE Updates)

सगेसोयरे अधिसूचनेवर सरकारकडून 16 फेब्रुवारीपर्यंत हरकती मागवण्यात आल्या होत्या. त्यावर तब्बल सहा लाख हरकती आल्याची माहिती शिंदेंनी (CM Eknath Shinde) दिली. ते म्हणाले, अधिसूचनेवर सहा लाख हरकती प्राप्त झाल्या आहेत. त्याची छाननी सुरू आहे. सर्व प्रक्रिया पूर्ण करून योग्य निर्णय घेतला जाईल. कर्मचारी आणि सर्व अधिकाऱ्यांना जबाबदारी दिली आहे. त्यानुसार वर्गीकरण केले जाईल.

जुन्या कुणबी नोंदणीप्रमाणे दाखले देण्याचे काम सुरू आहे. ओबीसी आरक्षणाला धक्का न लावता आरक्षण देण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. अधिसूचनेच्या अंमलबजावणीबाबत घाईगडबडीत कार्यवाही करणे लोकांच्या हिताचे नाही. त्यामुळे त्यावरही योग्य निर्णय घेतला जाईल. जसं सरकार बोलते तसा निर्णय घेतो. हे आज समजले. हे सर्वांनी समजून घेतले पाहिजे. मनोज जरांगे आणि सहकाऱ्यांना सांगू इच्छितो की, मी शपथ घेतल्यानंतर तीन महिन्यांत हे आरक्षण दिले आहे, असे शिंदे म्हणाले.   

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

वेळ मारून नेली?

मुख्यमंत्री शिंदे म्हणाले, एकनाथ शिंदेंनी वेळ मारून नेली, असे काही लोकांना वाटले. पण आम्ही सरकार म्हणून दीड वर्षात जे काम केले ते प्रत्येक निर्णय़ सर्वसामान्य माणसाच्या हिताचा घेतला. राज्यकर्त्यांना वैयक्तिक लाभ होईल, तेव्हा कुठलाही निर्णय घेतला नाही. त्यामुळे शब्द देताना विचारपूर्वक, दहा वेळा, शंभर वेळा विचार करून शब्द देतो. एकदा शब्द दिला की तो पाळण्याचा प्रयत्न करतो. शब्द फिरवत नाही. त्यामुळेच लोक माझ्यावर विश्वास ठेवतात. म्हणून आज या ठिकाणी शब्द पाळतोय.

मनोज जरांगेंनी जे आंदोलन केले आहे, त्यांच्या आंदोलनाचा एकजुटीचा हा विजय आहे. आंदोलकांनी आजवर कधी संयम सोडला नाही. या वेळी काही ठिकाणी अनुचित घटना घडल्या, त्या घडायला नको होत्या. आज मराठा समाजाने, जरांगेंनी आमच्यावर विश्वास ठेवत त्यावेळी उपोषण मागे घेतले. त्यानंतर आपण पुढची प्रक्रिया सुरू केली, असे शिंदे म्हणाले.

R

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT