Maratha Reservation Vishesh Adhiveshan : मोठी बातमी! मराठा आरक्षण विधेयक विधानसभेत एकमताने मंजूर

Maratha Reservation Maharashtra Assembly Special Session : विधिमंडळाच्या विशेष अधिवेशनात विधानसभेत मराठा आरक्षणाचे विधेयक एकमताने मंजूर झाले आहे...
Maratha Reservation
Maratha ReservationSarkarnama
Published on
Updated on

Maratha Reservation :

विधिमंडळाच्या विशेष अधिवेशनात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मांडलेले मराठा आरक्षण विधेयक एकमताने मंजूर झाले आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विधेयक सादर केल्यानंतर सरकार आरक्षणासाठी कसे कटिबद्ध आहे, हे स्पष्ट केले.

मुख्यमंत्र्यांनी सरकारची भूमिका स्पष्ट केल्यानंतर अध्यक्षांनी मतदान घेतले. त्यानंतर हे विधेयक आवाजी मतदानाने एकमताने मंजूर झाले.

राज्य सरकार दुजाभाव न करता काम करत आहे. ओबीसीला धक्का न लावता आम्ही मराठा समाजाला शैक्षणिक आणि नोकरीत आरक्षण देण्याचा निर्णय घेतला आहे. विरोधी पक्ष आणि आम्ही एका विचाराचे आहोत, असे मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले. ना कोणावर अन्याय, ना कोणाला धक्का असे म्हणत मराठा समाजाला आरक्षण (Maratha Reservation) देणार असल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी स्पष्ट केले. एवढेच नाही तर हा कायदा कोर्टात टिकेल याची खात्री बाळगा, असा विश्वासही मुख्यमंत्र्यांनी दिला. मराठा आरक्षण टिकावे यासाठी राज्य सरकार सर्व ताकद पणाला लावणार, असा विश्वास मुख्यमंत्री शिंदे यांनी व्यक्त केला.

बहुमताने नाही एकमताने

दरम्यान, हे विधेयक मंजूर झाल्यानंतर अध्यक्षांनी हे बहुमताने मंजूर झाल्याचे सांगितले. त्यावर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी विरोधक तसेच भुजबळांचीही मंजुरी असल्याचे सांगून हे विधेयक एकमताने मंजूर झाल्याचे सांगितले. त्यानंतर अध्यक्षांनी मराठा आरक्षणाचे विधेयक एकमताने मंजूर झाल्याचे जाहीर केले.

वडेट्टीवारांचा मुद्दा

मराठा समाजाला आरक्षण द्या, ही आमची पूर्वीपासूनची भूमिका होती. आमचा विरोध असण्याचे काहीच कारण नाही, असे विधानसभेतील विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी स्पष्ट केले.

(Edited by Sachin Fulpagare)

R

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com