मनोज जरांगे पाटील यांनी सरकारचे आभार मानून आमरण उपोषण संपवले.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांच्या भूमिकेचे कौतुक केले.
“तुमचं आमचं वैर संपलं” असे म्हणत आंदोलनाची सांगता केली.
Mumbai News : मनोज जरांगे पाटील यांनी मराठा आरक्षणासाठी सुरू केलेल्या आंदोलनास पाचव्या दिवशी यश आले. जरांगेंनी राज्य सरकारच्या शिष्टमंडळाने दिलेला जीआर स्विकारत हे आंदोलन संपवत असल्याची घोषणा केली. याचदरम्यान त्यांनी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचाही विशेष उल्लेख केला. यामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या. त्यांनी, फडणवीससाहेब, कटुता संपवूया, मी उपोषण सोडतोय असे म्हणत सुरू असणाऱ्या वादालाही ब्रेक लावल्याची घोषणा केली आहे.
मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा एकदा उपोषणाचे अस्त्र उपसले होते. यावेळी त्यांनी चलो मुंबईचा नारा दिला होता. दरम्यान सुरूवातीपासूनच त्यांनी फडणवीस यांच्यावर निशाना साधला होता. दरम्यान आधी आंदोलनास मुंबई उच्च न्यायालयाने नकार दिल्यानंतर फडणवीस यांच्यावर तिखट टीका केली होती. ज्यानंतर त्यांनी सतत फडणवीस यांनाच टार्गेट केले होते.
तसेच या आंदोलनात सहभागी झालेल्या आंदोलकांचे हाल होत असतानाही सरकारकडून त्यांना सुविधा उपलब्ध करून दिल्या जात नव्हत्या. यावरून देखील जरांगे यांनी फडणवीसांवर निशाणा साधत मराठ्यांना पाणी, जेवण मुख्यमंत्री मिळू देत नाहीत, अशी टीका केली होती. यानंतर मुंबई उच्च न्यायालयात सुनावणी सुरु असतानाच वकील गुणरत्न सदावर्ते यांनी युक्तीवादात राज्याचा मुख्यमंत्री मराठा नाहीत म्हणून हे आंदोलन घडवून आणले जात असल्याचा आरोप केला होता.
यादरम्यान आज आंदोलनच संपले असून जरांगे यांनी राज्य सरकारसह मंत्रिमंडळाचे आभार मानले आहेत. त्यांनी असून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी उपोषण सोडायला यावं, तुमचं आमचं वैर संपलं अशी घोषणाही केली आहे. तुम्ही या अथवा नका येऊ आमची हीच विनंती असल्याचेही जरांगे यांनी म्हटलं आहे.
जरांगे यांनी, आपण हे उपोषण आज सोडूया, उपोषण मागे घेत असल्याची घोषणा केल्यानंतर आणि वैर नसल्याचे स्पष्टीकरण दिल्यानंतर राधाकृष्ण विखे पाटील यांनी मुख्यमंत्र्यांसमवेत भेट घालून देऊ असे आश्वासन दिले आहे. तसेच, मुख्यमंत्री फडणवीस यांनी खूप मदत केली असून त्यांच्या सहकार्यामुळेच आम्ही इथपर्यंत आलो. जरांगे यांच्या मागण्या मान्य करू शकलो असेही विखे पाटील म्हणाले.
प्र.१: मनोज जरांगे पाटील यांनी उपोषण का केले होते?
👉 मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गातून आरक्षण मिळावे, या मागणीसाठी त्यांनी उपोषण सुरू केले होते.
प्र.२: उपोषणाचा शेवट कसा झाला?
👉 सरकारशी चर्चा आणि मागण्या मान्य झाल्यानंतर त्यांनी उपोषण संपवले.
प्र.३: कोणते नेते चर्चेत महत्त्वाचे होते?
👉 मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार.
प्र.४: जरांगे पाटील यांनी सरकारबद्दल काय म्हटले?
👉 त्यांनी म्हटले की, “तुमचं आमचं वैर संपलं” आणि सरकारचे आभार मानले.
प्र.५: आंदोलनाचा निकाल काय झाला?
👉 काही मागण्या मान्य झाल्या आणि त्यामुळे उपोषण संपवण्यात आले.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.