Imtiyaz Jaleel On Manoj Jarange And Maratha Reservation Agitation sarkarnama
महाराष्ट्र

Manoj Jarange Patil : जरांगेंसोबत बळजबरी केल्यास मुस्लिम समाज रस्त्यावर उतरेल; छातीचा कोट करून सर्वात पुढे असेल : जलील यांचा इशारा!

Imtiyaz Jaleel On Manoj Jarange : मनोज जरांगे पाटील उपोषणावर बसले असतानाच आता मुंबई मुंबई पोलिसांनी तीन वाजेपर्यंत आझाद मैदानही खाली करण्याची नोटीस दिली आहे. यामुळे आंदोलन चिघळण्याची स्थिती निर्माण झाली आहे.

Aslam Shanedivan

Summary :

  1. मनोज जरांगे पाटील यांचे मराठा आरक्षणासाठी आमरण उपोषण आज पाचव्या दिवशी दाखल झाले आहे.

  2. पोलिसांनी आझाद मैदान रिकामे करण्याची नोटीस बजावून दुपारी ३ वाजेपर्यंत खाली करण्याचे आदेश दिले आहेत.

  3. एमआयएम नेते इम्तियाज जलील यांनी आंदोलनाला पाठिंबा देत पोलिस बळजबरी केल्यास मुस्लिम समाज रस्त्यावर उतरेल असा इशारा दिला आहे.

Maratha Andolan : मराठा आरक्षण आंदोलन मनोज जरांगे पाटील हे गेल्या चार दिवसांपासून आमरण उपोषणावर बसले आहेत. आज (ता. 2) त्यांच्या आंदोलनाचा पाचवा दिवस आहे. दरम्यान त्यांचे हे उपोषण गुंडाळण्यासाठी राज्य सरकारने हालचाली सुरू केल्या असून आझाद मैदान रिकामे करण्याची नोटीस पोलिसांकडून बजावली आहे. तसेच आजच दुपारी 3 वाजेपर्यंत मैदान खाली करा असे सांगितले आहे.

यामुळे हे आंदोलन चिघळण्याची स्थिती निर्माण झाली आहे. अशातच एमआयएमचे प्रदेशाध्यक्ष माजी खासदार इम्तियाज जलील यांनी मनोज जरांगे पाटलांची भेट घेतली. जरांगेंना पोलिसांनी हाथ लावल्यास अथवा बळजबरी केल्यास मुस्लिम समाज छातीचा कोट करून सर्वात पुढे असेल, त्यांच्या संरक्षणासाठी रस्त्यावर असा इशारा देत पाठिंबा दिला आहे.

मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाची गंभीर दखल मुंबई उच्च न्यायालयाने घेतली आहे. आज दुपारी तीन वाजेपर्यंत रस्ते मोकळे करण्याचे आदेश दिले आहेत. यानुसार मुंबई पोलिस ॲक्शन मोडवर असून मुंबई शहरासह नवी मुंबईला छावणीचे स्वरूप आलं आहे. जब्बल 60 हजाराहून अधिक पोलीस रस्त्यावर राज्य सरकारने उतरवले आहे. दरम्यान मुंबई आणि नवी मुंबईतील चौकाचौकातील आंदोलकांची वाहने आणि आंदोलकांना उच्च न्यायालयाच्या आदेशानंतर हटवण्यात आले आहे.

दरम्यान एमआयएमचे प्रदेशाध्यक्ष माजी खासदार इम्तियाज जलील यांनी मनोज जरांगे पाटलांची भेट आझाद मैदावर जावून भेट घेतली. त्यांनी यावेळी अगदी पहिल्या दिवसापासून मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनास एमआयएमचे अध्यक्ष बॅरिस्टर असेदुद्दिन ओवेसी यांनी पाठिंबा दिला आहे. तसेच त्यांच्या आंदोलनाचा मुद्दा देखील लोकसभेत उचलला आहे.

जरांगे पाटील यांची आरक्षणाची मागणी रास्त असून ती सरकारने पूर्ण करायला हवी. ती पूर्ण न करता आता सरकार हे आंदोलन दडपण्याच्या प्रयत्न करत आहे. या आंदोलनाकडे सरकार अजिबात गांभीर्याने बघत नाही. या आंदोलनावर लवकरात लवकर तोडगा काढावा अशी आमची मागणी आहे. मी स्वत: जरांगे पाटील यांचा मोठा फॅन आहे. मी त्यांच्यासोबत कायम आहे व राहणार असेही जलील म्हणाले.

समाजाचा पूर्ण पाठिंबा...

तसेच जरांगे पाटील यांच्या याही आंदोलनास MIM चा आणि मुस्लिम समाजाचा पूर्ण पाठिंबा असून तो 200 टक्के आहे. त्यामुळे मी राज्य सरकार आणि मुंबई पोलीसांना हा इशारा देवू इच्छतो की, जरांगे यांच्यावर बळजबरी करू नका. सरकार अथवा पोलिसांनी बळजबरी केल्यास, हे आंदोलन संपवण्याचा प्रयत्न केल्यास याचे परिणाम भोगावे लागतील. या दडपशाहीच्याविरोधात जितक्या ताकदीने मराठा समाज रस्त्यावर उतरेल, तितक्याच ताकदीने मुस्लिम समाजही त्यांच्या खांद्याला खांदा लावून उतरलेला असले. आम्ही मराठा समाजासोबत राहू असाही इशारा त्यांनी दिला आहे.

सरकारला भीती का वाटते आहे?

जरांगे पाटील हे लोकशाही मार्गाने आंदोलन करत आहेत. जो सर्वांचा अधिकार आहे. हरियाणा आणि पंजाबमध्ये जेव्हा शेतकऱ्यांनी आंदोलन केले. ते महिनो चालले. शाहीनबाग आंदोलन महिनाभर चालले. असेच हेही आंदोलन होईल याची भीती सरकारला वाटते का? फक्त चारच दिवसात सरकार नोटीशी देऊन सांगते की आता घरी जा. करूद्या ना शांततेच्या मार्गाने त्यांना आंदोलन. ही लोकशाही आहे, हुकूमशाही नाही, असेही त्यांनी सरकारला ठणकावले आहे.

FAQs :

प्र.१: मनोज जरांगे पाटील किती दिवसांपासून उपोषण करत आहेत?
👉 ते गेल्या चार दिवसांपासून आमरण उपोषण करत असून आज पाचवा दिवस आहे.

प्र.२: पोलिसांनी काय कारवाई केली आहे?
👉 पोलिसांनी आझाद मैदान रिकामे करण्याची नोटीस बजावली आहे आणि ३ वाजेपर्यंत मैदान खाली करण्याचे आदेश दिले आहेत.

प्र.३: इम्तियाज जलील यांनी काय वक्तव्य केले आहे?
👉 त्यांनी इशारा दिला की जर पोलिसांनी जरांगे यांना हात लावला तर मुस्लिम समाज छातीचा कोट करून त्यांच्या संरक्षणासाठी रस्त्यावर उतरेल.

प्र.४: मुस्लिम समाजाची भूमिका काय आहे?
👉 मुस्लिम समाजाने मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाला खंबीर पाठिंबा दर्शविला आहे.

प्र.५: आंदोलनाची सद्यस्थिती काय आहे?
👉 आंदोलन अधिक चिघळण्याची परिस्थिती निर्माण झाली असून तणाव वाढण्याची शक्यता आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT