Maratha Reservation Agitation In Jalna : मराठा आरक्षण आंदोलन चिघळले; जालन्यात पोलिसांचा गोळीबार अन् लाठीचार्ज

Police Action Against Maratha Protest : आंदोलन चिरडण्याचा प्रयत्न असल्याचा विरोधकांचा प्रयत्न
Maratha Protest In Jalana
Maratha Protest In JalanaSarkarnama

Jalna Political News : जालन्यातील आंतरवाली सराटी येथे मराठा आरक्षण आणि इतर मागण्यांसाठी चार दिवसांपासून आंदोलन सुरू होते. चौथ्या दिवशी या आंदोलकांवर पोलिसांनी जोरदार लाठीचार्ज केला. तसेच यावेळी पोलिसांनी हवेत गोळीबार केल्याचीही माहिती मिळत आहे. आंदोलनाबाबत मुख्यमंत्र्यांशी बोलणे झाले होते. आंदोलनाबाबत पोलिसांशी चर्चा झाली होती. मात्र ते चिरडण्याचा प्रयत्न झाल्याचा आरोप विरोधकांनी केला आहे. परिणामी जालन्यात सुरू झालेले मराठा आंदोलन चिघळण्याची शक्यता आहे. यावर आता शिंदे-फडणवीस-पवार सरकार काय निर्णय घेणार याकडे राज्याचे लक्ष आहे. (Latest Political News)

जालन्यात झालेल्या मराठा समाजावरील लाठीचार्जचे पडसाद राज्यभर उमटण्याची शक्यता आहे. आंदोलकांवर झालेल्या हल्ल्यानंतर काही वेळात धुळे - सोलापूर महामार्गावरील वाहनांची जाळपोळ करण्यात आली. आंदोलनादरम्यान, दगडफेक झाल्याने पोलिसही जखमी झालेले आहेत. या घटनेनंतर समाज आक्रमक झाल्याचे दिसून येत आहे. माणुसकीला काळीमा फासणारी घटना म्हणत विरोधकांनी या लाठीचार्जचा निषेध केला आहे.

Maratha Protest In Jalana
Rahul Gandhi News : मुंबईतील 'इंडिया'ची बैठक संपताच राहुल गांधींनी पवार, ठाकरेंना डिवचलं; म्हणाले, शिवसेना, राष्ट्रवादी फुटली पण...

या आंदोनाबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी बोलणे झाले होते, यानंतरही गृहविभागाकडून अतिरेकी भूमिका घेतल्याचे राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी टीका केली. "गेल्या चार दिवसांपासून शांततेत सुरु असणाऱ्या आंदोलनाबाबत मुख्यमंत्री शिंदेंना आपली भूमिका ठाम असल्याचे आंदोलकांनी सांगितले. चौथ्या दिवशी मात्र अचनाक पोलिासंचा मोठा फौजफाटा आंदोलनस्थळी येतो आणि आंदोलकांना हुसकावून लावण्यासाठी लाठीचार्ज करतो. हा प्रकार निंदनीय आहे," असे म्हणत शरद पवारांनी राज्य सरकारवर निशाणा साधला.

Maratha Protest In Jalana
Modi Will Contest Lok Sabha In Pune : गुजरात, यूपीनंतर मोदी लोकसभा लढविणार महाराष्ट्रात?; काँग्रेसच्या 'या' आमदाराने दिले आव्हान

विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवारांनी शिंदे-फडणवीस-पवार सरकारवर सडकून टीका केली. ते म्हणाले, आरक्षणाची मर्यादा माहिती असूनही भाजप सरकारने मराठा आरक्षणाचे अश्वासन दिले. यापूर्वीही सरकारने याबाबत वेळकाढूपणा केल्यानेच आता ते आपल्या हक्कासाठी रस्त्यावर उतरले होते. ते शांततेत आंदोलन करत होते. आता पोलीस बळाचा वापर करून आंदोलन चिरडण्यात आले आहे. शिंदे-फडणवीस-पवार सरकारने मराठा समाजाची माफी मागावी. या घटनेचा निषेध करून जनतेने या सरकारला जागा दाखवून द्यावी."

(Edited by Sunil Dhumal)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com