Maratha Reservation Hearing Sarkarnama
महाराष्ट्र

Maratha Reservation : मराठा आरक्षणाबाबत आज 'गुड न्यूज' मिळणार? कोर्ट घेणार मोठा निर्णय!

Maratha Reservation Mumbai High Court Hearing : आरक्षणाच्या विरोधात याचिका करणाऱ्यांनी एसबीसीअंतर्गत मराठा समाजाला 10 टक्के आरक्षण दिल्याने आरक्षणाची 50 टक्क्यांची मर्यादा ओलांडली जात असल्याचा आक्षेप घेतला आहे.

Roshan More

Maratha Reservation Hearing : मराठा आरक्षणाचा प्रश्न पेटलेला असताना राज्य सरकाराने मराठा समाजाला एसईबीसी कायद्याअंतर्गत 10 टक्के आरक्षण दिले होते. हे आरक्षण सरकारी नोकऱ्या आणि शिक्षणात देण्यात आले होते. मात्र, या आरक्षणाच्या विरोधात हायकोर्ट आणि सुप्रीम कोर्टात याचिका दाखल करण्यात आल्या आहेत. आरक्षणाच्या बाजुने देखील याचिका दाखल आहेत.

मे महिन्यात सुप्रीम कोर्टाने मुंबई हायकोर्टाला सर्व याचिकांवर सुनावणी घेण्याचे निर्देश दिले होते. आरक्षणाच्या विरोधातील याचिकांमुळे उच्च शिक्षणातील मराठा समाजाच्या विद्यार्थ्यांना आरक्षण देण्यात अडचण येत असल्याचे समोर आले होते. अखेर मराठा आरक्षणाच्या वैधतेबाबतची नव्याने सुनावणी आजपासून (बुधवार) मुंबई हायकोर्टात होणार आहे. त्यामुळे आरक्षण वैध ठरणार की नाही याची फैसला होणार आहे.

विशेष खंडपीठासमोर आज सायंकाळी पाच वाजता मराठा आरक्षणाच्या संदर्भात सुनावणी होणार आहे. नव्याने ही सुनावणी होत असल्याने याचिकाकर्ते नवीन अहवाल, पुरावे कोर्टासमोर ठेवण्याची शक्यता आहे.

आरक्षणाच्या विरोधात याचिका करणाऱ्यांनी एसबीसीअंतर्गत मराठा समाजाला 10 टक्के आरक्षण दिल्याने आरक्षणाची 50 टक्क्यांची मर्यादा ओलांडली जात असल्याचा आक्षेप घेत त्याला विरोध केला होता. त्यानंतर आरक्षणाच्या समर्थनार्थ देखील याचिका करण्यात आल्या होत्या. या सर्व याचिकांवर एकत्रित सुनावणी घेण्याचे निर्देश सुप्रीम कोर्टाने मुंबई हायकोर्टाला दिले होते.

नव्याने सुनावणी का?

मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीस देवेंद्र कुमार उपाध्याय यांची जानेवारी महिन्यात दिल्ली उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायाधीशपदी नियुक्ती झाली होती. त्यांच्या बदलीने मराठा आरक्षणाच्या संदर्भातील याचिका रखडल्या होत्या. त्या याचिकाकर्ते सुप्रीम कोर्टात गेले. त्यामुळे सुप्रीक कोर्टाने मराठा आरक्षणाच्या संदर्भात नव्याने सुनावणी घेण्याचे निर्देश हायकोर्टाला दिले.

वैद्यकीय प्रवेशावर तत्काळ निर्णय घ्या

उच्च शिक्षणातील आरक्षणामुळे वैद्यकीय काॅलेजमधील प्रवेशाबाबत मराठा समाजाच्या विद्यार्थ्यांचे प्रवेश रखडले आहेत. निर्णय होत नसल्याने त्याचा फटका विद्यार्थ्यांना बसतो आहे. त्यामुळे वैद्यकीय प्रवेशाबाबत तात्काळ निर्णय घेण्याचे निर्देश देखील सुप्रीम कोर्टाने दिले आहेत.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT