Gopinath Munde Memorial Controversy: 'AIMIM' इम्तियाज जलील यांना थेट बीड, परळीतून धमक्या; काय होतं कारण...

AIMIM Imtiaz Jaleel Threatened Over Opposition to Gopinath Munde Memorial in Parli Beed: औरंगाबादच्या नामांतराला विरोध करणारे 'AIMIM' इम्तियाज जलील यांना बीड परळीतून धमकी आली होती.
AIMIM Imtiaz Jaleel
AIMIM Imtiaz JaleelSarkarnama
Published on
Updated on

AIMIM Maharashtra: 'AIMIM' इम्तियाज जलील हे त्यांच्या आक्रमक शैलीच्या राजकारणासाठी ओळखले जात असले, तरी त्यांची मराठवाड्याच्या विकासासाठी नेहमची धडपड राहिली आहे. यातूनच त्यांचा नेहमी विधायक कामांना नेहमी प्राधान्य असते.

अशातच त्यांनी लोकनेते गोपीनाथ मुंडे यांच्या स्मारकासंदर्भात भूमिका घेतल्याने त्यांना बीड परळीतून धमक्यांचा सपाटा सुरू झाला. पण ते शेवटपर्यंत आपल्या भूमिकेवर ठाम राहिले. या स्मारकाविरोधात त्यांनी न्यायालयात धाव घेतली आणि त्यांच्या लढ्याला यश आले. नेमकं काय प्रकरण होते, हे त्यांनी 'सरकारनामा'शी बोलताना सांगितले.

'AIMIM' नेते तथा प्रदेशाध्यक्ष इम्तियाज जलील यांनी देशात वाढत चाललेल्या धार्मिक आणि जातीच्या राजकारणावर 'सकाळ माध्यम समूहा'च्या सरकारनामा डिजिटलशी संवाद साधला. तरुणांमधील आजकाल वाढलेल्या कट्टरतेवर त्यांनी चिंता व्यक्त केली. यासाठी सत्तेतून भाजपला (BJP) दूर केलं पाहिजे, अशी भूमिका मांडली.

मराठवाड्याच्या विकासभिमुख भूमिकेला इम्तियाज जलील यांचे नेहमीच प्राधान्य राहिले आहे. याच त्यांच्या भूमिकेमुळे त्यांना विरोधक देखील खूप वाढले आहे. पण त्यांनी त्यांची भूमिका सोडलेली नाही.

यातून त्यांनी जालना रोडवर लोकनेते गोपीनाथ मुंडे यांच्या स्मारकाला विरोध केला होता. यामुळे त्यांना बीड (BEED) परळीतून धमक्यांचा सपाटा सुरू झाला. प्रचंड दबाव आणला होता. पण ते भूमिकेवर ठाम राहिल्याचा किस्सा त्यांनी सांगितले.

AIMIM Imtiaz Jaleel
Talathi corruption : 'जे नसे ललाटी, ते लिखे तलाठी'; 26 तलाठ्यांनी हडपले 35 कोटी

गोपीनाथ मुंडे लोकनेते होते. माझे चांगले मित्र होते. मी त्यांचा आजही आदर करतो. माझ्या मते, महाराष्ट्राला दोन मोठे लोकनेते लाभले, एक विलासराव देशमुख आणि दुसरे गोपीनाथ मुंडे! या मतावर इम्तियाज जलील ठाम आहेत.

AIMIM Imtiaz Jaleel
Uddhav Thackeray Shiv Sena: मुंबई जिंकण्यासाठी ठाकरे सेनेची अशी आहे रणनीती

जालना रोडवर मुंडे यांचे स्मारक बांधायचे नियोजन सुरू होते. परंतु इम्तियाज यांनी स्मारकाला उघडपणे विरोध केला. त्यानंतर शिवीगाळ करून, धमक्या देऊन त्यांच्यावर दबाव सुरू झाला. मुंडेंना श्रद्धांजली द्यायची असेल, तर त्यांच्या नावाने रुग्णालय बांधा, समाजोपयोगी कार्यातून लोकनेत्यांना आपल्यामध्ये जिवंत ठेवा, ही भूमिका घेत इम्तियाज जलील आपल्या भूमिकेवर ठाम राहिले. लोकनेत्याच्या स्मारकाला विरोध करतो म्हणून रोज बीड-परळीहून दमदाटी, धमक्यांचे फोन सुरू झाल्याची माहिती इम्तियाज यांनी दिली.

हॉस्पिटलला लोकनेते गोपीनाथ मुंडेंचं नाव द्यावं

अखेर इम्तियाज जलील यांनी याविरोधात उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल केली. आता त्या जागेवर चारशे बेडचे हॉस्पिटल बांधले जात आहे. आठ महिन्यांत ते पूर्ण होईल. ‘एमआयएम’चा खासदार असताना, आपण सरकारला पत्र लिहून विनंती केली आहे, की या हॉस्पिटलला लोकनेते गोपीनाथ मुंडेंचं नाव द्यावं. हा लढा यशस्वी झाल्याचा आनंद आहेच, परंतु लोकनेत्यांचे नाव गोरगरिबांच्या सेवा करणाऱ्या वास्तूद्वारे आणखी जिवंत राहिल, याचा मोठा आनंद आहे, अशी प्रतिक्रिया इम्तियाज जलील यांनी दिली.

महापुरूषांच्या नावाने विष पेरले जाते

महाराणा प्रताप यांच्या स्मारकासाठी औरंगाबाद महापालिकेकडे पैसे नव्हते. मी तिथेही विरोध केला. स्मारकापेक्षा त्यांच्या नावाने ग्रामीण भागात एक सैनिकी शाळा उभारण्याचे सुचवले. थोडक्यात, स्मारक-पुतळे यातून काही साध्य होत नाही.

पुतळ्यांची एरवी साफसफाई होत नाही. परंतु निवडणूक आली की, या महापुरूषांच्या नावाने विष पेरले जाते, त्याला आपला विरोध आहे, असे इम्तियाज जलील यांनी सरकारनामाशी बोलताना सांगितले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com