Marathi Bhasha Gaurav Din controversy: राज्यात मराठी भाषा गौरव दिन सर्वत्र साजरा होत असतानाच लोकप्रतिनिधी मराठी भाषा दिनाबाबत किती उदासिन आहेत, याचा प्रत्यय आज विधिमंडळात आला. विधिमंडळाच्या बाहेर मराठी-हिंदी वादावर बोलणारे लोकप्रतिनिधी मराठी भाषेच्या कार्यक्रमाला गैरहजर असतात, हे कितपत योग्य आहे, असा प्रश्न राज्यातील जनतेला पडल्याशिवाय राहणार नाही.
मराठी भाषा गौरव दिनानिमित्त विधीमंडळात आज विशेष कार्यक्रम सकाळी आयोजित करण्यात आला होता. यांचे निमंत्रण विधानसभा, विधानपरिषदेच्या सर्व सदस्यांना पाठविण्यात आले होते.
पण या मायमराठीच्या कार्यक्रमाला ९० टक्के आमदार आणि लोकप्रतिनिधींनी दांडी मारल्याचे दिसून आले. या प्रसंगामुळे 'आपुल्या घरात हाल सोसते मराठी' या कविवर्य सुरेश भट यांच्या ओळी आठवल्या शिवाय राहणार नाहीत.
मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि प्रमुख मंत्री यांची उपस्थिती वगळता आमदारांची अनुपस्थिती लक्ष वेधणारी होती. गैरहजर असलेले हे सगळे आमदार, यावेळी कुठल्या कार्यक्रमाला किंवा कोणत्या कामात व्यग्र होते, याची चर्चा सध्या विधानभवन परिसरात सुरु आहे.
ठाकरे सेनेसह विरोधी पक्ष आणि सत्ताधाऱ्यांचेही अनेक बडे नेते यांची या कार्यक्रमाला अनुपस्थिती होती. पूर्वसूचना देऊनही आमदारांनी या कार्यक्रमाला दांडी मारली का मारली? याचे पडसाद सध्या सुरु असलेल्या अर्थसंकल्पीय अधिवेशात उमटणार का? हे लवकरच समजेल.
पाहुणे जरी असंख्य पोसते मराठी
आपुल्या घरात हाल सोसते मराठी
हे असे कितीक 'खेळ' पाहते मराठी
शेवटी मदांध तख्त फोडते मराठी
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.