Himgauri Adke News: नाशिककरांच्या मूळ प्रश्नांना हात घालत महापौरांनी घेतला मोठा निर्णय!

Nashik Mayor Himgouri Adke Nashik civic App: नागरिक आणि महापालिका यांच्यातील समन्वय वाढविण्यावर त्या भर देणार आहे. हा समन्वय वाढविण्यासाठी नियमितपणे नागरिकांची संपर्क निर्माण केला जाईल. यासाठी महापौरांचे स्वतंत्र कार्यालय देखील निर्माण केले जाणार आहे.
Mayor Himgauri-Adke
Mayor Himgauri-AdkeSarkarnama
Published on
Updated on

Nashik NMC News: नाशिक महापालिकेत गेली चार वर्ष प्रशासकीय राजवट होती. या पार्श्वभूमीवर प्रशासन आणि नागरिक यांच्यात दुरावा होता. आता हा दुरावा दूर करण्यासाठी महापौरांनी एक मोठा निर्णय घेतला आहे.

आगामी सिंहस्थाच्या पार्श्वभूमीवर शहरात महापालिकेचे रस्ते विकासाचे अनेक कामे सुरू आहेत. त्यामुळे 19 ठिकाणी वाहतूक वळविण्यात आली आहे. नागरिकांना त्याचा मोठ्या प्रमाणावर मनस्ताप होतो.

या पार्श्वभूमीवर महापौर हिमगौरी आडके यांनी नागरिकांविषयी दिलगिरी व्यक्त केली आहे. नागरिकांना रस्ते बंद आणि नादुरुस्त असल्याने अडचणी येतात. त्या लवकरात लवकर दूर करण्याचा प्रयत्न करणार असल्याचे त्यांनी सांगितले.

यानिमित्ताने महापौर आडके यांनी एक मोठा निर्णय घेतला आहे. नागरिक आणि महापालिका यांच्यातील समन्वय वाढविण्यावर त्या भर देणार आहे. हा समन्वय वाढविण्यासाठी नियमितपणे नागरिकांची संपर्क निर्माण केला जाईल. यासाठी महापौरांचे स्वतंत्र कार्यालय देखील निर्माण केले जाणार आहे.

नाशिक शहरात सिंहस्थ कुंभमेळा होत आहे. त्या दृष्टीने शहर विकासाची मोठी कामे हाती घेण्यात आली आहेत. नाशिक शहराच्या भविष्यातील विकासाचा वेध घेऊन ही कामे हाती घेण्यात आली आहेत. शहराला त्याचा नक्कीच मोठा लाभ होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

नागरिकांच्या समस्या सोडविण्यासाठी महापालिका कटिबद्ध आहे. अनुषंगाने एनएमसी ई कनेक्ट हा ॲप निर्माण करण्यात येईल. माध्यमातून महापौर नागरिकांच्या नियमित संपर्कात राहतील. नागरिकांनी आपल्या तक्रारी आणि सूचना या ॲपद्वारे मांडाव्यात, असे त्या म्हणाल्या.

Mayor Himgauri-Adke
Malegaon Mahapalika News: महापालिकेत नमाज पठण प्रकरणी विद्युत अभियंता निलंबित; प्रशासनाकडून गंभीर दखल

शहरात मोठ्या प्रमाणावर वाहतूक कोंडी होते. वाहतूक कोंडी दूर करण्यासाठी नागरिकांनी वाहतुकीचे नियम पाळावे. शहरातील प्रदूषण कमी करण्यासाठी हातभार लावावा. यासंदर्भात नागरिकांची नियमित संपर्क प्रस्थापित करण्याचा मनोदय महापौरांनी व्यक्त केला आहे.

नाशिक शहरातील नागरिकांशी समन्वय निर्माण करणे आणि वाहतूक कोंडी पासून तर प्रदूषणापर्यंत महत्त्वाच्या विषयांना महापौरांनी प्राधान्यक्रम दिला आहे. त्यामुळे महापौरांचा हा नवा उपक्रम चर्चेचा विषय ठरण्याची चिन्हे आहेत. यानिमित्ताने एक मोठा उपक्रम महापौरांनी हाती घेतल्याने नागरिकांच्या महत्त्वाच्या प्रश्नांना त्यांनी यानिमित्ताने हात घातला आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com