Police presence in Dahisar following the assault on a Marathi tribal family by a mob. sarkarnama
महाराष्ट्र

Marathi Family Assault Video : प्रचारासाठी आले अन् मराठी कुटुंबाला मारले, उत्तर भारतीयांची मुजोरी; व्हिडिओ व्हायरल, मुंबईत काय घडलं?

Mumbai Election Dahisar Crime : प्रचारासाठी आलेल्या उत्तर भारतीयांकडून जमाव करून मराठी कुटुंबाला घरात घुसून मारहाण केल्याची घटना दहीसरमध्ये घडली आहे.

Roshan More

Dahisar Crime : मुंबई महापालिका निवडणुकीच्या प्रचारासाठी उत्तर भारतीयांनी मराठी आदिवासी कुटुंबाच्या घरात घुसून त्यांना मारहाण केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या प्रकरणी पोलिस ठाण्यात तक्रार करण्यात आलेली आहे. या प्रकरणी आठ ते दहा जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, मारहाणीचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, दहीसरमधील कांदरपाडा येथे विजय पाटील हे त्यांच्या कुटुंबासह राहतात. ते सुरक्षा रक्षक म्हणून काम करतात. सोमवारी संध्याकाळच्या वेळी त्यांच्या घरात न विचारता सूजय यादव आणि सूरज पांडे हे घुसले. आणि येथेच प्रचार करायचा का असा प्रश्न एकमेकांना करू लागले. परवानगी न घेता घरात आल्याने पाटील यांनी जाब विचारला असता आरोपींनी फोन करून आपल्या सहकाऱ्यांना बोलावून घेतले.

प्रमिला पाटील यांनी पोलिसांना दिलेल्या माहितीनुसार, आपल्या हातात नऊ महिन्यांचे बाळ होते. आरोपी माझ्याकडे चुकीच्या नजरेने पाहत होते. त्यावरून माझ्या पतीने त्यांना जाब विचारला असता आरोपींनी त्यांच्या आणखी साथीदारांना फोन करून बोलावून घेतले. जमावाने मिळून माझ्या पती आणि दिराला मला मारहाण केली.

पोलिस तक्रार घेत नव्हते...

तक्रारदार प्रमिला पाटील यांनी सांगितले की, आम्हाला केलेल्या मारहाणीची तक्रार घेण्यास पोलिस तयार नव्हते. दरम्यान, मारहाणीचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला. दरम्यान, या प्रकरणामुळे मराठी बांधवांकडून संताप व्यक्त केला जात आहे. दरम्यान, मारहाण करणारे एकनाथ शिदेंच्या शिवसेनेचे कार्यकर्ते असल्याचे सांगितले जात आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT