

Akola Municipal Election : राज्यातील महापालिका निवडणुकांच्या प्रचारासाठी अवघे सहा दिवस उरले आहेत. तसा प्रचाराचा ज्वर वाढला आहे. भाजप महायुती आणि त्यातील मित्रपक्षांनी राज्यात प्रचाराचा जोर वाढवला असताना, विरोधकांनी देखील प्रचाराची राळ उडवून दिली आहे.
अकोला महापालिका निवडणुकीच्या प्रचारात ठाकरेच्या शिलेदाराना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अन् उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याविरोधात घणाघात केला. 'एकनाथ शिंदे हे भगव्याच्या आड लपलेला 'सैतान' आहे,' अशी जहरी टीका आमदार नितीन देशमुख यांनी केली. आमदार देशमुख यांनी टीका करताना वापरलेल्या शब्दावरून गदारोळ सुरू झाला आहे.
अकोला जिल्ह्यातील बाळापूरचे शिवसेना (Shivsena) उद्धव बाळासाहेब ठाकरे सेना पक्षाचे आमदार नितीन देशमुखांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा उल्लेख 'सैतान' असा केला. अकोला महापालिकेतील शिवसेना ठाकरे पक्षाच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ त्यांची उमरी इथं प्रचारसभा झाला.
'एकनाथ शिंदे हे भगव्याच्या आड लपलेला सैतान आहे. एकनाथ शिंदेंचा (Eknath Shinde) उल्लेख गद्दार आणि सैतान, असा केला. त्यांच्या पक्षाचं आयुष्य हे कोंबडीच्या आयुष्य एवढंच आहे, असेही आमदार देशमुख यांनी म्हंटलं. ज्या दिवशी भाजप त्यांना कापून खाईन, त्या दिवशी त्यांचं आयुष्य संपणार. शिंदेंची शिवसेना ही हिंदुत्वाची मतं खाण्यासाठी भाजपने उभी केलेला पक्ष आहे,' असाही घणाघात आमदार देशमुख यांनी म्हटले.
नितीन देशमुख यांनी भाजप नेते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर देखील निशाणा साधला. "जाती-जातीत आरक्षणासाठी भांडण लावणारा पाहिला मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्याने बघितला. महापालिका निवडणुकीत बटेंगे तो कटेंगे चालणार नाही, म्हणून ओबीसी, मराठा, एससी, एनटी समाजातं भांडण लावलं," असा गंभीर आरोप देशमुखांनी फडणवीस यांच्यावर केला.
'गुजरातचे 2 बनिया देशात बनवा बनवी करत आहेत. आपल्याला मत मिळत नाही, म्हटल्यावर ते मत धनुष्यबाणाला, वंचितला कसं जाईल, याचं नियोजन करत आहे. वंचितंला विनंती आहे की, मताचं विभाजन न करता, भाजपला हद्दपार करा. 20 वर्षापूर्वी भाजपची भोंग्याची गाडी आली, तर म्हणायाचे बनियाची गाडी आली,' असाही टोला भाजपला लगावला.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.