State Election Commission Sarkarnama
मराठवाडा

Election Duty : महापालिका निवडणुकीच्या धामधुमीत 17 कर्मचाऱ्यांना दणका : थेट गुन्हे दाखल, प्रशासनाची कडक भूमिका

Municipal Corporation Action : महापालिका निवडणुकीपूर्वी निवडणूक कामात कुचराई व प्रशिक्षणाला दांडी मारणाऱ्या 17 कर्मचाऱ्यांविरोधात गुन्हे दाखल करण्यात आले असून प्रशासनाने कडक भूमिका घेतली आहे.

Jagdish Pansare

Municipal Corporation News : महानगरपालिका निवडणूक प्रक्रिया सुरु असतानाच प्रशासनातील कर्मचाऱ्यांमध्ये निवडणुकीच्या कामावरून उदासिनता दिसून आली आहे. यामुळे निवडणूक कामासाठी नियुक्त करण्यात आलेल्या 17 कर्मचाऱ्यांवर कामात कचुराई करणे, प्रशिक्षणाला दांडी मारणे, चुकीचे मोबाईल नंबर नोंदवणे अशा कारणांवरून थेट पोलीसांत गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

छत्रपती संभाजीनगर महापालिका प्रशासकांच्या या दणक्यानंतर इतर कर्मचाऱ्यांमध्ये भितीचे वातावरण आहे. महापालिका निवडणुकीच्या कामासाठी नियुक्त 17 कर्मचाऱ्यांनी दांड्या मारली होती. विशेष म्हणजे या सर्वांनी चुकीचे मोबाइल नंबर दिले होते. त्यांच्या कार्यालयाकडून सूचना दिल्यानंतरही ते कामावर रुजू झाले नसल्याने प्रशासनाने त्यांच्यावर कारवाईचा बडगा उगारला आहे.

निवडणूक निर्णय अधिकारी तथा महापालिकेचे प्रशासक जी. श्रीकांत यांनी स्मार्ट सिटी कार्यालय येथे सर्व निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांची बैठक घेऊन निवडणूक प्रक्रियेच्या तयारीचा आढावा घेतला. निवडणूक निर्णय अधिकारीनिहाय माहिती प्रशासकांनी घेतली. त्यात क्षेत्रीय अधिकाऱ्यांची उपलब्धता व संख्या, नियुक्त कर्मचाऱ्यांचे प्रशिक्षण, मतदानाच्या दिवशी तसेच मतमोजणीच्या दिवशी करण्यात येणाऱ्या नियोजनाचा समावेश आहे.

यावेळी स्थिर सर्वेक्षण पथकात नियुक्त करण्यात आलेले एकूण 17 अधिकारी व कर्मचारी कर्तव्यास रुजू न झाल्याने त्यांच्याविरुद्ध नियमानुसार गुन्हा दाखल करण्यात आल्याचे जी. श्रीकांत यांनी सांगितले. या कर्मचाऱ्यांनी दिलेले मोबाइल नंबर चुकीचे असल्याचे निदर्शनास आले होते. त्यांच्या कार्यालयाकडून रुजू होण्याची ताकीद देण्यात आली होती. तरीदेखील ते उपस्थित न झाल्याने सिटी चौक पोलिस ठाण्यात त्यांच्या विरोधात गुन्हे नोंद झाले आहेत.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT