Latur Collector office News
Latur Collector office News Sarkarnama
मराठवाडा

Latur Collector Office : अबब...कारकुनाने लुटले तब्बल २३ कोटी; बनावट सह्यांद्वारे सरकारी योजनांचे पैसे वळविले भावाच्या खात्यावर

सरकारनामा ब्यूरो

लातूर : लातूर (Latur) जिल्हाधिकारी (Collector) कार्यालयातील एका अव्वल कारकूनाने (पेशकार) दस्तूरखुद जिल्हाधिकाऱ्यांच्या नावावर असलेल्या विविध योजनांच्या सरकारी निधीतून सुमारे २२ कोटी ८७ लाख ६२ हजार २५ रूपये अधिकाऱ्यांच्या बनावट स्वाक्षरी करून स्वतःसह भाऊ व भावाच्या दुकानातील कर्मचाऱ्यांच्या खात्यावर वळवून गैरव्यवहार केल्याचे उघड झाले. जलयुक्त शिवार योजनेतील (Jalyukta Shiwar Yojana) देयक जमा न झाल्याचे पुढे आल्यानंतर पाच महिन्यांपासून चौकशी करण्यात आल्यानंतर हा गैरव्यवहार उघड झाला. या प्रकरणी कारकूनासह चौघांविरूद्ध गुन्हा दाखल झाला आहे. कारकूनासह दोघांना न्यायालयाने ३० जानेवारीपर्यंत पोलिस कोठडी सुनावली. (23 Crores was embezzled by a clerk in the Latur Collector office)

अव्वल कारकून मनोज नागनाथ फुलेबोयणे, त्याचा भाऊ अरुण नागनाथ फुलेबोयणे, सुधीर रामराव देवकते व चंद्रकांत नारायण गोगडे अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. यात मनोज फुलबोयणे, चंद्रकांत गोगडे हे अटकेत आहेत. या प्रकरणी जिल्हाधिकारी कार्यालयातील तहसीलदार (सर्वसाधारण) महेश परंडेकर यांनी शनिवारी (ता. २१ जानेवारी) रात्री एमआयडीसी पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे.

मनोज फुलेबोयणे याने ता. २६ मे २०१५ ते आठ जून २०२२ या कालावधीत हा गैरव्यवहार केल्याचे निष्पन्न झाले. मनोजने बनावट प्राधिकारपत्र तयार केली. अधिकाऱ्यांच्या बनावट स्वाक्षऱ्या करून शिक्क्यांचा गैरवापर केला. त्यातून कोट्यवधी रूपये भाऊ अरुण प्रोपायटर असलेल्या तन्वी कृषी केंद्र, तन्वी ॲग्रो एजन्सीज व ऋषीनाथ ॲग्रो एजन्सीजच्या बँक खाते तसेच सुधीर देवकते व चंद्रकांत गोगडे यांच्या बँक खात्यावर वर्ग केले. यासोबत धनादेशातील अक्षरी, अंकी रक्कमेच्या ठिकाणी रिकामी जागा ठेऊन त्यानंतर त्यात वाढ करून रक्कम लाटली. त्यानंतर आकस्मिक खर्चासाठी रोखपाल म्हणून काढण्यात येणाऱ्या धनादेशावर याच पद्धतीने कोट्यवधी रूपये स्वतःच्या खात्यात वर्ग केले.

जलयुक्त शिवार योजनेतील कामाचे दोन बिलाचे आरटीजीएस केल्यानंतर ही रक्कम संबंधित यंत्रणेच्या खात्यात जमा झाली नाही. अनेक दिवस चौकशी केल्यानंतर या खात्यात रक्कम गायब असल्याचे व मनोज फुलेबोयणे यानेच ती गायब केल्याचे पुढे आले. त्यानंतर जिल्हाधिकारी पृथ्वीराज बी. पी. यांनी मनोज फुलेबोयणे यांच्या काळातील सर्व व्यवहाराची चौकशी केली. चौकशीअंती मनोज फुलेबोयणे यांच्यासह चौघांविरूद्ध २२ कोटी ८७ लाख ६२ हजार २५ रूपयांचा गैरव्यवहार केल्याप्रकरणी परंडेकर यांनी तक्रार दाखल केली. पोलिस निरीक्षक संजीवन मिरकले तपास करीत आहेत.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT