Sujay Vikhe On Tambe : फडणवीस काय करतील याचा नेम नाही; तांबेंनी कर्डिलेंना भेटावं सर्व ठीक होईल : सत्यजित यांच्या उमेदवारीवर विखेंचे भाष्य

अपेक्षित वेगळं असतं आणि घडतं अनपेक्षित.
Devendra Fadnavis-Satayjeet Tambe- Sujay Vikhe Patil
Devendra Fadnavis-Satayjeet Tambe- Sujay Vikhe Patil Sarkarnama
Published on
Updated on

पुणे : नाशिक पदवीधर मतदारसंघातून अपक्ष निवडणूक लढविणारे सत्यजित तांबे (Satyajeet Tambe) यांना त्यांचे कट्टर राजकीय विरोधक खासदार सुजय विखे पाटील (Mp Sujay Vikhe Patil) यांनी अनोखा सल्ला दिला आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) कधी काय करतील, याचा कुणालाही अंदाज नाही, असे सांगून‘सत्यजित तांबे यांनी शिवाजीराव कर्डिले (Shivajirao Kardile) यांना येऊन भेटावं, सर्वकाही ठीक होईल,’ असा सल्ला विखे यांनी तांबे यांना दिला. (Comment of Sujay Vikhe Patil on the candidature of Satyajeet Tambe)

युवक काँग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष सत्यजित तांबे यांनी नाशिक पदवीधर मतदारसंघातून अपक्ष उमेदवारी अर्ज भरला आहे. त्यानंतर काँग्रेसने त्यांच्यावर निलंबनाची कारवाई केली आहे. त्या पार्श्वभूमीवर नगरचे खासदार सुजय विखे पाटील यांनी तांबे यांच्या उमेदवारीवर भाष्य केले.

Devendra Fadnavis-Satayjeet Tambe- Sujay Vikhe Patil
Udayan Gadakh Wedding Ceremony : शिवसेनेच्या पडझडीतही एकनिष्ठ राहणाऱ्या गडाखांच्या लग्नाला आदित्य ठाकरेंची नार्वेकरांसह हजेरी

खासदार विखे म्हणाले की, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस काय करतील, याचा कुणालाही अंदाज नाही. नेमकं काय होतंय आणि ते कधी काय करतील, हे कुणीही सांगू शकत नाही, असं त्यांचं वैशिष्ट्य आहे. आपण त्याचं उदाहरण विधान परिषद आणि राज्यसभेच्या निवडणुकीवेळी पाहिलं आहे. अपेक्षित वेगळं असतं आणि घडतं अनपेक्षित.

Devendra Fadnavis-Satayjeet Tambe- Sujay Vikhe Patil
Maharashtra Politics : प्रकाश आंबेडकर काँग्रेस-राष्ट्रवादीसह शिवसेनेबरोबर आघाडी करण्यास तयार

सत्यजित तांबे यांची अपक्ष उमेदवारी हा देवेंद्र फडणवीस यांचा मास्टर स्ट्रोक आहे. या सर्व प्रकरणात काय राजकारण आहे, हे तुम्हाला लवकरच कळेल. थोड्याच दिवसांत हे सर्व प्रकरण स्पष्ट होणार आहे. जोपर्यंत देवेंद्र फडणवीस आपली भूमिका स्पष्ट करत नाहीत, तोपर्यंत या विषयावर मी बोलणं संयुक्तीक नाही, असेही विखे यांनी नमूद केले.

Devendra Fadnavis-Satayjeet Tambe- Sujay Vikhe Patil
Moreshwar Temurde : राष्ट्रवादीच्या माजी आमदाराचे झोपेतच हृदयविकाराने निधन

सत्यजित तांबे यांनी माजी आमदार शिवाजीराव कर्डिले यांना येऊन भेटावं, सर्व काही ठीक होऊन जाईल, असा सल्ला खासदार विखे यांनी सत्यजित तांबे यांना दिला आहे. आता तो सल्ला तांबे किती मनावर घेतात, हे पाहणे औत्सुक्याचे आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com