Nanded : कंधार मतदारसंघाचे आमदार श्यामसुंदर शिंदे यांच्या मुंबईतील घरात २५ लाखांची चोरी झाली आहे. शिंदे यांच्या चालकाने मित्राच्या मदतीनेच ही चोरी केल्याचे समोर आले आहे. (25 lakh theft at the house of MLA Shyamsunder Shinde) या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून चालक व त्याच्या आरोपी मित्रांचा शोध सुरू आहे. आमदार श्यामसुंदर शिंदे यांच्या मुंबईतील घरात चोरी झाल्याने एकच खळबळ उडाली आहे.
चोरी केलेले आरोपी एवढ्यावरच थांबले नाहीत, तर त्यांनी शिंदे यांना ३० लाखांची खंडणी देखील मागितल्याची माहिती समोर आली आहे. (Fir Filed) या प्रकरणी एन. एम. जोशी पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस आरोपींच्या मागावर आहेत. (Nanded) श्यामसुंदर शिंदे यांचे मुंबईतील लोढा बॅलोसिमो को-ऑप हौसिंग सोसायटीमध्ये घर आहे.
शिंदे यांचा कारचालक चक्रधर पंडित मोरे याने मित्र अभिजीत कदमच्या मदतीने ही चोरी केल्याचे समजते. गेल्या महिन्यात दोघांनी ही चोरी केल्याचे सांगितले जाते. (Marathwada) या चोरीत घरातून तब्बल २५ लाख रुपयांचा ऐवज चोरण्यात आला आहे. चोरी केल्यानंतर श्यामसुंदर शिंदे यांच्याकडे आरोपींनी ३० लाख रुपयांची खंडणी देखील मागितली होती.
१ जूनपर्यंत पैसे मिळाले नाही तर रायगडला जाऊन स्वत:ला इजा करुन घेईन आणि सोशल मीडियावर तुमची बदनामी करेन, अशी धमकी आरोपीने आमदार शिंदे यांना दिली. यानंतर श्यामसुंदर शिंदे यांच्या पीएने एन. एम. जोशी पोलीस स्टेशनमध्ये चालक चक्रधर पंडित मोरे, त्याचा मित्र अभिजीत कदम यांच्याविरोधात तक्रार दाखल केली. पोलिसांनी या प्रकरणात गुन्हा दाखल केला आहे. श्यामसुंदर शिंदे हे नांदेडमधील शेकापचे लोहा-कंधार मतदारसंघाचे आमदार व नांदेड भाजपचे खासदार प्रताप पाटील चिखलीकर यांचे भावजी आहेत.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.