Ramdas Athawale Offer to Ambedkar : ''आपण दोघे मिळून भाजपसोबत राहू...''; आठवलेंची खुली ऑफर, आंबेडकर टाळी देणार?

Maharashtra Politics : '' उद्धव ठाकरेंकडे तुम्हांला काही मिळणार नाही...''
Ramdas Athawale, Prakash Ambedkar
Ramdas Athawale, Prakash AmbedkarSarkarnama
Published on
Updated on

Shirdi : वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष व नेते प्रकाश आंबेडकर यांनी ठाकरे गटासोबत युती केली आहे. त्यामुळे राज्यात पुन्हा एकदा शिवशक्ती भिमशक्तीचा प्रयोग समोर आला आहे. मात्र, त्यांच्या महाविकास आघाडीतील वंचितच्या सहभागाचं भिजत घोंगडं राहिलं आहे. मात्र, एकीकडे वंचितवरुन ठाकरे गट आणि महाविकास आघाडीच्या भूमिकेविषयी ठोस भूमिका घेतलेली नसतानाच आता रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे अध्यक्ष व केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी प्रकाश आंबेडकरांना पुन्हा एकदा खुली ऑफर दिली आहे.

शिर्डी येथे पार पडलेल्या रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या राज्यस्तरीय अधिवेशन रविवारी पार पडले. यावेळी केंद्रीय मंत्री रामदास आठवले(Ramdas Athwale) यांनी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केलं. आठवले म्हणाले, प्रकाश आंबेडकरांनी माझ्यासोबत यावं. मी त्यांना भाजपकडे घेऊन जातो. आपण दोघे मिळून भाजपसोबत राहू या.. उद्धव ठाकरेंकडे तुम्हांला काही मिळणार नाही असे आवाहन रिपाईचे अध्यक्ष रामदास आठवले यांनी प्रकाश आंबेडकर यांना केलं आहे.

Ramdas Athawale, Prakash Ambedkar
Eknath Shinde News : मुख्यमंत्री शिंदेंची मोठी घोषणा; सी लिंकला 'स्वातंत्र्यवीर सावरकर समुद्रसेतू' नाव आणि...

ठाकरे आणि आंबेडकर भाजपसोबत आले तर...

आठवले म्हणाले, प्रकाश आंबेडकर(Prakash Ambedkar) आमचे नेते आहेत मात्र रिपाई ज्यांच्या बाजूने असते त्यांनाच सत्ता मिळते. त्यामुळे प्रकाश आंबेडकरांनी माझ्यासोबत यावे मी त्यांना भाजपकडे घेऊन जातो. आपण दोघे मिळून भाजप आणि नरेंद्र मोदींसोबत राहू. तर उद्धव ठाकरेंनी देखील काँग्रेस राष्ट्रवादी सोबत राहू नये ते कसे आहेत मला माहीत आहे.

उद्धव ठाकरे आणि प्रकाश आंबेडकर भाजपसोबत आले तर त्यांचे स्वागतच असल्याचे रामदास आठवले म्हणाले.. त्याचबरोर 'महाविकास आघाडी(Mahavikas Aaghadi) दाखवतेय वज्रमूठ.. आणि रोज करतेय सगळ्यांची लूट' असा आपल्या खास शैलीत आठवले यांनी महाविकास आघाडीचावर निशाणा साधला.

Ramdas Athawale, Prakash Ambedkar
Chhatarapati Sambhajiraje News: मी तसलं काही केलं नाही, त्यामुळे मी ईडीला घाबरत नाही : संभाजीराजेंनी ठणकावले

कार्यकर्त्यांना चांगलेच खडेबोल सुनावले...

अधिवेशनादरम्यान बेशिस्त कार्यकर्त्यांना रामदास आठवले यांनी चांगलेच खडेबोल सुनावले. रिपब्लिकन पक्षाचा बाजार करू नका. इतर पक्षांमध्ये तुम्ही अशा पध्दतीची वर्तणूक पाहिली का? नुसते फोटो काढून, स्टेजवर गर्दी आणि घोषणाबाजी करून पक्ष वाढणार नाही. बेशिस्तपणामुळे पार्टीचा सत्यानाश झाला असून हे थांबले नाही तर अशा लोकांना पक्षातून काढून टाकीन. अशा शब्दात आठवले यांनी कार्यकर्त्यांच्या बेशिस्तपणाबद्दल जाहीर नाराजी व्यक्त केली..

प्रकाश आंबेडकरांची शिंदेंना ऑफर...

वंचितचे प्रकाश आंबेडकरांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे(Eknath Shinde) यांची काही दिवसांपूर्वी भेट घेतली होती. यानंतर आंबेडकरांनी रिक्षावाला मुख्यमंत्री झाल्याचा आनंद असल्याचं विधान केलं होतं. त्याचबरोबर शिंदेंनी भाजपची साथ सोडून वंचितसोबत यावं अशी खुली ऑफरही आंबेडकरांनी दिली होती. आतापर्यंत श्रीमंतांची माणसं मुख्यमंत्री झाली. एक रिक्षावाला मुख्यमंत्री झाला यातच आमचा आनंद आहे.

मी म्हणण्यापेक्षा शिंदेंच म्हणाले की, प्रकाशराव ही घटना आहे म्हणून झालो. नाहीतर आपल्याला कुणीच विचारलं नसतं. मी त्यांना म्हणालो, तुमचे मित्र…त्यांचं काय? ते म्हणाले, ‘अवघड दुखणं असतं प्रकाशराव. मी त्यांना म्हणालो पडा बाहेर आपण एकत्र येऊ असंही आंबेडकर म्हणाले होते.

(Edited By Deepak Kulkarni)

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com