Harshvardhan Jadhav News, Aurangabad
Harshvardhan Jadhav News, Aurangabad Sarkarnama
मराठवाडा

Harshvardhan Jadhav : शाह, पाटील यांच्याबाबत आक्षेपार्ह वक्तव्य भोवलं; हर्षवर्धन जाधव यांच्यावर गुन्हा दाखल

सरकारनामा ब्यूरो

Harshvardhan Jadhav News : कन्नडचे माजी आमदार हर्षवर्धन जाधव यांनी देशाचे गृहमंत्री अमित शाह आणि चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांच्याबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य केल्याप्रकरणी हर्षवर्धन जाधव यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हर्षवर्धन जाधव यांच्यावर दत्तवाडी पोलिस ठाण्यात हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

एका महिलेने हर्षवर्धन जाधव (Harshvardhan Jadhav) यांच्याविरोधात ही तक्रार दिली असल्याचं सांगण्यात येत आहे. माहितीनुसार, फिर्यादी महिला त्यांच्या राहत्या घरी असताना त्यांच्या मोबाईलवर एक व्हिडिओ आला. त्या व्हिडिओमध्ये हर्षवर्धन जाधव हे केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आणि पुण्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्याबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य केलं. तसेच व्हिडिओमध्ये खालच्या पातळीवर बोलताना दिसले असं म्हटलं आहे.

दरम्यान, माजी आमदार हर्षवर्धन जाधव यांनी सोशल मीडियावर चंद्रकांत पाटील आणि गृहमंत्री अमित शाह यांच्याबाबत अवमानकारक शब्द वापरत त्यांची बदनामी करत खालच्या स्तराची भाषा वापरत लैंगिक स्वरूपाची टिप्पणी करत व्हिडिओ शेअर केला होता.

याच पार्श्वभूमीवरच भारतीय दंडात्मक कलम ३५४ (अ) सह विविध कलमाअंतर्गत हर्षवर्धन जाधव यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबतचा पुढील तपास पोलीस करत असून माजी आमदार हर्षवर्धन जाधव यांच्या अडणची वाढण्याची शक्यता आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT