Sanjay Raut News
Sanjay Raut News  Sarkarnama
मराठवाडा

Sanjay Raut News : लोकसभेसाठी आघाडीच्या १६ - १६- १६ फॉर्म्युल्याची चर्चा ? पण संजय राऊत म्हणतात,''ठाकरे गट...''

सरकारनामा ब्यूरो

Nanded : लोकसभेच्या निवडणुका आता अवघ्या काही महिन्यांवर येऊन ठेपल्या आहेत. याचदरम्यान, लोकसभा निवडणुका डोळ्यांसमोर ठेवत भाजपनं जोरदार तयारी सुरु केली आहे. याचदरम्यान भाजपनं महाराष्ट्रातील ४८ जागा जिंकण्याचा निर्धार केला आहे. याचवेळी आता महाविकास आघाडीतील कोणता पक्ष लोकसभेच्या किती जागा लढवणार याबाबत राजकीय वर्तुळात चर्चा जोर धरु लागली आहे.

याचवेळी महाविकास आघाडी(Mahavikas Aaghadi) त राष्ट्रवादी, शिवसेना, काँग्रेस हे तीन पक्ष लोकसभेसाठी समसमान 16-16-16 जागा लढविण्याच्या फॉर्म्युल्यावर चर्चा झाली असल्याची माहिती समोर येत आहे. तसेच काँग्रेस या फॉर्म्युल्यासाठी आग्रही असल्याची सूत्रांची माहिती आहे. पण आता लोकसभेच्या जागा वाटपावरुन आघाडीत वादाची ठिणगी पडण्याची शक्यता आहे. कारण राऊतांनी लोकसभेच्या जागावाटपाबाबत मोठा दावा केला आहे.

संजय राऊत(Sanjay Raut) हे आज (दि.१९) नांदेड दौऱ्यावर आहेत. यावेळी माध्यमांशी संवाद साधला. राऊत म्हणाले, आमचे २०२४ ला १९ खासदार लोकसभेत राहतील. २०१९ मध्ये जिंकलेल्या सर्व जागा लढविणारच आहे. लोकसभेच्या निवडणुकांसाठी कोणी किती जागा लढवाव्यात यावर प्राथमिक चर्चा सुरु आहे. आघाडीत अद्याप १६ - १६ - १६ चा फॉर्म्युला अद्याप ठरलेला नाही. पण शरद पवारांच्या निवासस्थानी झालेल्या आघाडीच्या बैठकीत या अशा प्रस्तावावर कोणतीही चर्चा झालेली नाही.

प्रत्येकी १६ जागा लढविण्याचा फॉर्म्युला ठरल्याचं मला माध्यमांमधूनच कळतंय. पण त्या बैठकीत फक्त बैठका कुणी घ्यायच्या, कशा घ्यायच्या, सूत्र काय असावं यावर चर्चा झाली असल्याचंही राऊतांनी सांगितले.

महाविकास आघाडी एकत्र आहे आणि राहील. तसेच आगामी लोकसभा, विधानसभा निवडणुका वज्रमुठींनं महाविकास आघाडी एकत्र लढवणारच आहे. आम्ही जिंकलेल्या जागा त्या राहणारच. आता महाराष्ट्रात राष्ट्रवादीनं ४ जागा जिंकल्यात आणि काँग्रेसनं १ जिंकल्यात त्यावर कसं काय चर्चा होणार आहे. काँग्रेसनं जसं १ जागा जिंकलीय ती त्यांच्याकडे राहणारच आहे. जिंकलेल्या जागा या जिंकलेल्या जागा असतात.

जिंकून आल्यावर कुणी इकडं तिकडं गेलेत त्याचा निकाल लागायचा आहे. पण त्या जागा शिवसेनेच्या आहेत. त्यामुळे महाराष्ट्रात १८ आणि दादरा हवेली येथील १ असे १९ खासदार आहेत. ते कायम राहतील असं स्पष्ट मतही राऊतांनी यावेळी व्यक्त केलं.

कर्नाटक विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर काँग्रेससह महाविकास आघाडीतील राष्ट्रवादी आणि ठाकरे गटाकडून आनंद व्यक्त करतानाच कर्नाटक विधानसभा निवडणुकीतील फॅक्टर महाराष्ट्रात पण लागू होणार असल्याचा दावा केला जात आहे. यावर टीका करताना राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस(Devendra Fadnavis) यांनी कर्नाटक फॅक्टरचा महाराष्ट्रात काहीही परिणाम होणार नाही असं म्हटलं होतं. तसेच महाराष्ट्रात २०१९ पेक्षा जास्त जागा जिंकू असा दावा केला होता.

यावर राऊत म्हणाले, राज्यातील बेकायदेशीर सरकारमधील नेत्यांना काय बोलायचं ते बोलू द्या. आगामी निवडणुकांमध्ये कोणता फॅक्टर चालतोय ते दिसेलच.त्यांच्यात हिंमत असेल तर त्यांनी महापालिका निवडणुका घेऊत दाखवाव्यात. मग जे काही ते समोर येईल असा पलटवारही फडणवीसांवर केला.

(Edited By Deepak Kulkarni)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT