Jayant Patil Statement: "नार्वेकर आमचे जावई.. ते तसं करणार नाहीत"; जयंत पाटील असं का म्हणाले..

Jayant Patil On Rahul Narvekar: .भाजपवर नागरिकांचा किती राग आहे, हे कर्नाटकच्या निवडणुकांमधून स्पष्ट झाले," असे जयंत पाटील म्हणाले.
Jayant Patil ON Rahul Narvekar
Jayant Patil ON Rahul NarvekarSarkarnama
Published on
Updated on

Jayant Patil On Rahul Narvekar: महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षावर काही दिवसापूर्वी सुप्रीम कोर्टानं निर्णय दिला आहे. शिंदे गटाच्या सोळा आमदारांना अपात्र ठरविण्याचा निर्णय घेण्याचा अधिकार विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांना न्यायालयानं दिला आहे.

किमान पुरेसा वेळेत (रिजनेबल टाईम) सोळा आमदारांच्या अपात्रेबाबत निर्णय द्यावा, अशा सूचना न्यायालयाने दिल्या आहेत. याबाबतचा निर्णय घेण्यासाठी घाई करायची नाही व विलंबही करायचा नाही.जो निर्णय होईल, तो निर्णय संविधानातील तरतुदी व न्यायालयाच्या निर्देशानुसारच घेतला जाईल, असे नार्वेकरांनी स्पष्ट केले आहे.

Jayant Patil ON Rahul Narvekar
Imran Khan News : इम्रान खान यांच्या घराबाहेर पोलिसांचा घेराव ; लष्कराने दिले हे दोन पर्याय

यावर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते, प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ते गुरुवारी पुण्यात माध्यमांशी बोलत होते. "भाजप आता लोकप्रिय पक्ष राहिलेला नाही.भाजप हा सर्वसामान्यांचा नव्हे, तर धनिकांची पाठराखण करणारा पक्ष म्हणून त्यांची गणना होत आहे.भाजपवर नागरिकांचा किती राग आहे, हे कर्नाटकच्या निवडणुकांमधून स्पष्ट झाले," असे जयंत पाटील म्हणाले.

जयंत पाटील म्हणाले, ""स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका ऑक्‍टोबर-नोव्हेंबर महिन्यात होण्याची शक्‍यता आहे. मात्र भाजप निवडणुका लांबवत जाण्याचे काम करीत असून त्यास राष्ट्रवादीला जबाबदार धरत आहे. प्रत्यक्षात, राष्ट्रवादी नव्हे, तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यामुळेच निवडणुकांना विलंब होत आहे,"

Jayant Patil ON Rahul Narvekar
Amruta Fadnavis Blackmail Case: फडणवीस ब्लॅकमेल प्रकरणी मोठी अपडेट; बुकी अनिल जयसिंघानी, त्याची मुलगी अनिक्षा..

सोळा आमदारांच्या अपात्रेबाबत जयंत पाटील म्हणाले, " न्यायालयाने अपात्र आमदारांबाबत निर्णय घेण्यासाठी राहूल नार्वेकर यांना किमान पुरेसा वेळ (रिजनेबल टाईम) दिला आहे. नार्वेकर हे आणखी किती वेळ घेतात, याची सर्वोच्च न्यायालयच वाट पाहत आहे. न्यायालयाने दिलेल्या निकालास बगल देण्याचे काम केले आहे," अशी टीका जयंत पाटील यांनी केली.

ते म्हणाले, "नार्वेकर आमचे जावई आहेत, ते तसे करणार नाही, आमचा त्यांच्यावर विश्वास आहे,' असा टोला त्यांनाी लगावला.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com