Chhatrapati Sambhajinagar sarkarnama
मराठवाडा

Chhatrapati Sambhajinagar News : सत्ताधारी पक्षाच्या पदाधिकाऱ्यांचा 'कार'नामा, बापलेकांना उडवले; गुन्हा दाखल होईना...

Jagdish Pansare

Chhatrapati Sambhajinagar Accident : पुण्याच्या हिट अ‍ॅण्ड रन प्रकरणामुळे राज्यातील राजकीय वातावरण तापलेले असताना इकडे छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील (Chhatrapati Sambhajinagar Accident) पैठण रोडवर झालेल्या एका अपघाताची चर्चा होत आहे. भाजप-शिवसेना शिंदे गटाचे पदाधिकारी ज्या कारने जात होते, त्या कारने सोमवारी (ता.26) सायंकाळी एका दुचाकीला जोराची धडक दिली. या अपघातात बापलेक गंभीर जखमी झाले होते.

पैठण येथील शिवसेना (Shiv Sena) शिंदे गटाचे उपजिल्हाप्रमुख आणि भाजपचे (BJP) तालुकाप्रमुख या कारमध्ये असल्याचा दावा केला जात आहे. बिडकीन पोलिस (Police) ठाण्याच्या हद्दीत हा अपघात (Accident) घडून 48 तास उलटून गेले तरी याप्रकरणी अद्याप गुन्हा दाखल झालेला नाही. गुन्हा दाखल होऊ नये यासाठी पोलिसांवर राजकीय दबाव आणला जात असल्याचा आरोप आहे. जखमी बापलेकावर छत्रपती संभाजीनगर (Chhatrapati Sambhajinagar) येथील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. त्यांचे जबाब घेण्याचे काम पोलिस करत असून त्यानंतर गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया होणार असल्याचे सांगितले जाते. बाप-लेकाची प्रकृती चिंताजनक असल्याचे बोलले जाते. हा अपघात भीषण होता हे गाडीच्या अवस्थेवरून दिसते.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

पैठण (Paithan Accident) तालुक्यातील बिडकीन जवळील ढाकेफळ ते वडगाव मुलानी रस्त्यावर हा अपघात झाला. यात दुचाकीस्वार इसाक यासीन शेख (वय 50), अन्वर इसाक शेख (वय 25, रा. तारू पिंपळवाडी, ता. पैठण) येथील हे बापलेक गंभीर जखमी झाले. लग्नाचा कार्यक्रम आटोपून दुचाकीने घरी जात होते. दरम्यान, भरधाव जाणाऱ्या कारने दुचाकीला जोरदार धडक दिली. यात दुचाकीवरील बापलेक गंभीर जखमी झाले. Shiv Sena-BJP office bearer car accident in Paithan

स्थानिक नागरिकांनी दुचाकीस्वाराला धडक देऊन पळून जाणाऱ्या चार चाकी वाहनचालकाला अडवले आणि जखमी इसाक शेख व अन्वर शेख यांना खासगी वाहनाने खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. दरम्यान धडक देणाऱ्या कारमध्ये पैठण येथील भाजप आणि शिवसेना शिंदे गटाचे उपजिल्हाप्रमुख, तालुकाप्रमुख इतर पदाधिकारी होते, अशी चर्चा आहे. दरम्यान, धडक दिलेली कार पोलिसांनी जप्त केली असून ती दुसऱ्याच व्यक्तीच्या नावावर असल्याचे समोर आले आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT