Nanded Political News Sarkarnama
मराठवाडा

Nanded Political News : नांदेडात कृषी महाविद्यालय कोणामुळे ? चव्हाण, चिखलीकर, कल्याणकरांमध्ये श्रेयवाद

Congress News : कृषी महाविद्यालयाला माजी मुख्यमंत्री कै. शंकरराव चव्हाण यांचे नाव द्यावे, असा प्रस्ताव पाठविण्यात आला होता.

Jagdish Pansare

Marathwada Politics : मराठवाड्यात परभणीनंतर आता नव्याने नांदेडमध्ये कृषी महाविद्यालय मंजूर करण्यात आले आहे. यासाठी राज्य सरकारकडून १४६ कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. (Nanded Political News) या कृषी महाविद्यालयाला मंजुरी मिळवण्यावरून माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण, भाजपचे खासदार प्रताप पाटील चिखलीकर, शिवसेना शिंदे गटाचे आमदार बालाजी कल्याणकर यांच्यात श्रेयवाद रंगला आहे.

तर येत्या काळात नांदेड कृषी महाविद्यालयाच्या नावावरून सत्ताधारी व विरोधकांत वाद रंगण्याचीही शक्यता आहे. नांदेडमध्ये कृषी महाविद्यालय करण्यात यावे, अशी गेल्या अनेक दिवसांपासूनची मागणी होती. ही मागणी नुकतीच छत्रपती संभाजीनगर येथे पार पडलेल्या मंत्रिमंडळ बैठकीत मंजूर करण्यात आली. त्यामुळे (Nanded) नांदेड येथील नेतेमंडळीनी केलेल्या मागणीला यश आले.

दुसरीकडे मात्र यावरून माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण, (Ashok Chavan) भाजपचे खासदार प्रताप पाटील चिखलीकर, (Pratap Patil Chikhalikar) शिवसेना शिंदे गटाचे आमदार बालाजी कल्याणकर यांच्याकडून यासाठी पाठपुरावा केला असल्याचे सांगितले जात आहे. त्यामुळे नव्या श्रेयवादाला तोंड फुटले आहे. दुसरीकडे राज्य सरकारकडे काँग्रेसकडून पाठविण्यात आलेल्या प्रस्तावात या कृषी महाविद्यालयाला माजी मुख्यमंत्री कै. शंकरराव चव्हाण यांचे नाव द्यावे, असा प्रस्ताव पाठविण्यात आला होता.

मात्र, हे नाव वगळून नांदेड येथील कृषी महाविद्यालया मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मंजुरी दिली आहे. त्यामुळे येत्या काळात या कृषी महाविद्यालयाच्या नावावरून भाजप, काँग्रेस व शिवसेनेत वाद रंगण्याची शक्यता आहे. दुसरीकडे हे कृषी महाविद्यालय लातूरमध्ये करावे, अशी मागणी तत्कालीन पालकमंत्री अमित देशमुख यांनी केली होती.

मात्र, या वादाच्या मुद्द्यात कृषिमंत्री धनंजय मुंडे यांनी आपले वजन नांदेडच्या पारड्यात टाकल्याने त्या ठिकाणी कृषी महाविद्यालयाला मंजुरी मिळाली आहे. राज्यातील ट्रिपल इंजिन सरकारने नांदेडात कृषी महाविद्यालय मंजूर केल्यामुळे शिंदे आणि भाजप गटाकडून श्रेय घेण्याचे प्रयत्न सुरू झाले आहेत.

राष्ट्रवादीकडून मात्र असा दावा अद्याप तरी कुणी केलेला नाही. तीन महिन्यांपूर्वी अजित पवार व त्यांचा गटही सरकारमध्ये सामील झाला आहे. त्यामुळे जिल्ह्यातला एखादा राष्ट्रवादीचा नेताही चव्हाण-चिखलीकर- कल्याणकरांच्या श्रेयवादाच्या लढाईत उडी घेण्याची शक्यता नाकारता येत नाही. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील सरकारने नांदेड कृषी महाविद्यालयाचा निर्णय घेतल्यामुळे साहजिकच श्रेय घेण्याच्या स्पर्धेत ते आघाडीवर आहेत

तर दुसरीकडे राज्यात आणि केंद्रातही सत्ता असलेल्या भाजपचे खासदार प्रताप पाटील चिखलीकर यांनी मात्र आपल्याच पाठपुराव्यामुळे नांदेडला कृषी महाविद्यालय मिळाल्याचा दावा केला आहे. महाविकास आघाडी सरकार असतानापासूनच या कृषी महाविद्यालयासाठी आपण प्रयत्न करत होतो, असे अशोक चव्हाण समर्थकांकडून सांगितले जात आहे.

Edited By : Jagdish Pansare

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT